ETV Bharat / state

दोघी मैत्रिणींचा विहिरीत बुडून मृत्यू; दिंडोरीच्या सावरपावडा येथील घटना

तालुक्यातील सावरपाडा येथील पल्लवी वाघमारे, नीलम गवारी आणि कल्पना नामदेव गुंबाडे या तिघी मैत्रिणी कपडे धुण्यासाठी काल (मंगळवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास सावरपाडा शिवारातीलच विहिरीवर गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर पल्लवी आणि नीलम विहिरीच्या पाण्यात अंघोळ करु लागल्या.

two friends drowned in well in savarpada dindori
दोघी मैत्रिणींचा विहिरीत बुडून मृत्यू
author img

By

Published : Jun 2, 2021, 6:48 AM IST

दिंडोरी (नाशिक) - विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिंडोरी तालुक्यातील सावरपाडा येथे घडली. पल्लवी विश्वनाथ वाघमारे (वय-12), आणि नीलम धर्मराज गवारी (वय-15) अशी मृतांची नावे आहेत.

मैत्रिणीला वाचविण्याचा प्रयत्न -

तालुक्यातील सावरपाडा येथील पल्लवी वाघमारे, नीलम गवारी आणि कल्पना नामदेव गुंबाडे या तिघी मैत्रिणी कपडे धुण्यासाठी काल (मंगळवारी) दुपारी एक वाजेच्या सुमारास सावरपाडा शिवारातीलच विहिरीवर गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर पल्लवी आणि नीलम विहिरीच्या पाण्यात अंघोळ करु लागल्या. अचानक पल्लवी पाण्यात बुडायला लागली. हे बघून नीलम तिला वाचवण्यासाठी धडपड करू लागली. मात्र, दुर्दैवाने दोघीही पाण्यात बुडू लागल्या.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

विहिरीच्या काठावर बसलेल्या कल्पनाने आपल्या मैत्रिणींना पाण्यात बुडताना पाहून एकच आक्रोश करत गावात जाऊन ग्रामस्थांना बोलावून आणले. गावातील ग्रामस्थांनी या दोघींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने ग्रामस्थांचे प्रयत्नांना यश आले नाही आणि पल्लवी आणि नीलम या दोघी मैत्रिणींचा मृत्यू झाला. गावातील नेहमी सोबत राहणाऱ्या जिवलग मैत्रिणींचा सोबतच करुण अंत झाल्याने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात सीआरपीसी १७४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर १९प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.