ETV Bharat / state

देशभरातील २० हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर

एचएएलचे देशातील नऊ प्रभागातील 20 हजार कर्मचारी अनेक महिन्यांपासून वेतनवाढीसाठी आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी शनिवारी बंगळूरू येथे बैठक घेण्यात आली. मात्र, त्यात व्यवस्थापनाने समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियन समितीने बैठकीचा त्याग केला.

देशभरातील वीस हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर
author img

By

Published : Oct 14, 2019, 3:20 PM IST

नाशिक - हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कामगारांची बंगळूरू येथे वेतनवाढी संदर्भात बैठक घेण्यात आली होती. मात्र, बैठकीत वेतनवाढी संदर्भात समाधानकारक निर्णय झाला नाही. त्यामुळे देशभरातील २० हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. नाशिकमधील साडेतीन हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. एचएएलवर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या लघुउद्योगांना संपामुळे फटका बसणार आहे.

देशभरातील वीस हजार एचएएल कर्मचारी बेमुदत संपावर

हेही वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये आज दुपारपासून सुरू होणार मोबाईल सेवा

एचएएलचे देशातील नऊ प्रभागातील 20 हजार कर्मचारी अनेक महिन्यांपासून वेतनवाढीसाठी आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी शनिवारी बंगळूरू येथे बैठक घेण्यात आली. मात्र, त्यात व्यवस्थापनाने समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियन समितीने बैठकीचा त्याग केला आणि संप पुकारण्याचा निर्णय घेतला.

या आहेत कामगारांच्या मागण्या

व्यवस्थापनाकडून कामगारवर्गाची पिळवणूक होत आहे. अधिकाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ मिळत आहे. कामगारांना मात्र त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जात आहे. असा आरोप कामगारांनी केला आहे. प्रलंबित वेतन कराराची बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, आश्वासन दिल्याप्रमाणे वेतनवाढ द्यावी, अशी मागणी एचएएल कर्मचाऱ्यांनी केली आहे. कामगार संघटना 5 वर्षांऐवजी 10 वर्षे मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या. मात्र, असूनही व्यवस्थापनाने कामगारांची निराशा केली आहे. अधिकाऱ्यांना 35 टक्के वेतनवाढ दिली. मात्र, कामगारांना अवघी आठ टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. व्यवस्थापनाकडून कामगारवर्गाला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, असा आरोप कामगार संघटनेने केला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कामगारांना सन्मानपूर्वक प्रस्ताव मिळत नसल्याने संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित केला आहे.

Intro:एच एल कामगारांची बेंगलोर येथे वेतनवाढी संदर्भात बैठक घेण्यात आली होती या बैठकीत वेतनवाढी संदर्भात समाधानकारक निर्णय न झाल्याने देशभरातील वीस हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे नाशिकमधील साडेतीन हजार कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहे एच एलवर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या लघुउद्योगांना संपामुळे फटका बसणार आहेBody:एचएएलचे देशातील नऊ प्रभागांतील 20 हजार कर्मचारी अनेक महिन्यांपासून वेतनवाढीसाठी आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी शनिवारी बंगळूरू येथे बैठक घेण्यात आली.मात्र, त्यात व्यवस्थापनाने समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियन समितीने
बैठकीचा त्याग केला व संप पुकारण्याचा निर्णय घेतला.Conclusion:व्यवस्थापनाकडून कामगारवर्गाची पिळवणूक होत असून,
अधिकाऱ्यांना 34 महिन्यांपूर्वीच वाढीव वेतनाचा लाभ मिळत
आहे. कामगारांना मात्र त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवले जात
असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. प्रलंबित वेतन
कराराची बोलणी लवकरात लवकर पूर्ण करावी, आश्वासन
दिल्याप्रमाणे वेतनवाढ द्यावी, अशी मागणी एचएएल
कर्मचाऱ्यांनी केली आहे. कामगार संघटना 5 वर्षांऐवजी 10 वर्षे मुदतीच्या वेतन कराराच्या बोलणीसाठी तयार झाल्या असूनही व्यवस्थापनाने कामगारांची निराशा केली आहे. अधिकाऱ्यांना 35 टक्के वेतनवाढ दिली असताना, कामगारांना मात्र अवघी आठ टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. व्यवस्थापनाकडून कामगारवर्गाला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, असा आरोप कामगार संघटनेने केला आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही कामगारांना सन्मानपूर्वक प्रस्ताव मिळत नसल्याने संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित केलाय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.