ETV Bharat / state

पोलिसांनी २० हजार रुपये लुबाडल्याचा व्यापाऱ्याचा आरोप, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - नाशिक

आपण मद्यप्राशन केले होते. नियमाचे उल्लंघन केले असेल तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता धाक दाखवून पैसे घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा यांनी व्हिडिओद्वारे केला आहे.

पोलिसांवर आरोप करताना व्यापारी
author img

By

Published : May 29, 2019, 11:02 AM IST

नाशिक - कारवाईचा धाक दाखवून नाशिकरोड पोलिसांनी खिशातून २० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा या व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

पोलिसांवर आरोप करताना व्यापारी

नाशिकरोड येथे जुन्या स्टेट बँक मार्गावरील एका हॉटेलमधून ओम प्रकाश वर्मा हे रात्री च्या सुमारास मद्यप्राशन करून घरी जात होते. यावेळी दोन पोलिसांनी त्यांना मद्यप्राशन केल्याने पोलीस ठाण्यात चलायला सांगितले. पोलीस ठाण्यापर्यंत नेत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या खिशातून २० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन व्यापाऱ्याला धाक दाखवण्यात आला. यानंतर काही वेळाने त्याला रजिस्टरवर सही घेऊन सोडून देण्यात आले, असे व्यापाऱ्याने म्हटले आहे.

आपण मद्यप्राशन केले होते. नियमाचे उल्लंघन केले असेल तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता धाक दाखवून पैसे घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा यांनी व्हिडिओद्वारे केला आहे. यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी या व्यापाऱ्याने केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये नवनियुक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. कार्यतत्पर म्हणून नांगरे यांची सर्वत्र ओळख आहे. मात्र, नाशिकमध्ये तसे होताना दिसून येत नाही. नाशिकमध्ये गेल्या महिनाभरापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. चेन स्नाचिंग, चोरी, घरफोडी यांसारख्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पोलीस खात्यातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता 'कुंपणच शेत खात' असेच म्हणावे लागेल. नाशिक रोड पोलीस ठाण्याचा कारभार सध्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे चांगलाच गाजत आहे. सिन्नर फाटा येथे वाहतूक पोलिसांनी काठी फेकून मारलेला युवक कोमात गेल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच २ पोलिसांनी व्यापाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून खिशातून वीस हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. आता आयुक्त विश्वास नांगरे पाटील यावर काय कारवाई करतात? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:पोलिसांनी वीस हजार रुपये लुबाडल्याचा व्यापऱ्याचा आरोप..व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल..

Body:नाशिक रोड येथील व्यापाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी खिशातून वीस हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा या व्यापाऱ्यांनी केला आहे, यासंदर्भात पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्याचा दावाही त्यांनी केला असून, या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल केलाय...
नाशिक रोड पोलीस ठाण्याचा कारभार सध्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे चांगलाच गाजत आहे, सिन्नर फाटा येथे वाहतूक पोलिसांनी काठी फेकून मारलेला युवक कोमात गेल्याचं प्रकरण ताजे असतांना दोन पोलिसांनी व्यापाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून खिशातून वीस हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला,या संदर्भात त्यांनी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल केला असून यासंदर्भात पोलिस नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्याचा दावा त्यांनी केलाय,

नाशिकरोड येथे जुन्या स्टेट बँक मार्गावरील एका हॉटेलमधून ओम प्रकाश वर्मा हे व्यापारी रात्री मद्यप्राशन करून घरी जात असतांना दोन पोलिसांनी ह्या व्यापाऱ्याला पोलिसांनी ठाण्यापर्यंत नेत असतांना एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या खिशातून वीस हजार रुपये काढून घेतले ,नंतर पोलीस ठाण्यात नेऊन व्यापाऱ्याला धाक दाखवण्यात आला त्यानंतर काही वेळाने रजिस्टरवर सही घेऊन सोडून देण्यात आले,आपण मद्यप्राशन केले होते नियमाचे उल्लंघन केले असेल तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते, मात्र तसे न करता धाक दाखवून पैसे घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा यांनी व्हिडिओ मार्फत केला आहे, यासंदर्भात नाशिक रोड पोलीस स्टेशन आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले अशीही मागणी या व्यापाऱ्यांने केली आहे..
काही महिन्यापूर्वीच नाशिकमध्ये नवनियुक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे,कार्यतत्पर म्हणून नांगरे यांची सर्वत्र ओळख आहे ,मात्र नाशिकमध्ये तसं होताना दिसून येत नाही,नाशिकमध्ये गेल्या महिन्याभरापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे,चॅन स्नाचिंग,चोरी,घरफोडी यासारख्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पोलीस खात्यातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडं पैसे लुबाडत असल्याच्या घटना घडत आहे, यामुळे आता कुंपणच शेत खात असंच म्हणावे लागेल ,जर ह्या घटनेत तथ्य असले तर आयुक्त विश्वास नांगरे पाटील ह्यावर कारवाई करतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे...
टीप फीड ftp
nsk police crime

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.