नाशिक - सटाणा तालुक्यातील दोधेश्वर घाटातील मुख्य वळणावर 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणार ट्रॅक्टर पलटी ( Student Vehicle Accident ) होऊन या अपघातात एक विद्यार्थी ठार तर, 20 ते 22 विद्यार्थी जखमी ( student injured ) झाल्याची घटना घडली आहे. सोमवार निमित्त भाविकांची दोंधेश्वर येथील मंदिरात गर्दी होत असल्यास त्याठिकाणी स्वयंसेवक म्हणून विद्यार्थी बागलाण अकॅडमीचे 40 विद्यार्थी ट्रॅक्टर मधून जात असताना, ट्रॅक्टर घाटातील मुख्य रस्त्यावर पलटी झाला. या अपघात मालेगाव तालुक्यातील निमशेवरी येथील निलेश कन्नोरे हा विद्यार्थी ठार झाला असून इतर 20 ते 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. याबद्दलची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यानंतर आमदार दिलीप बोरसे त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सर्व जखमी विद्यार्थ्यांना सटाणा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन 20 ते 22 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सटाना तालुक्यात ही घटना घडली आहे.
दोधेश्वर घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉली पलटी ( Student Vehicle Accident ) झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेत 20 ते 22 विद्यार्थी झाले जखमी ( student injured ) झाले असून, यातील काही विद्यार्थ्यांना सटाणा तर, काही विद्यार्थ्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या गटनेबाबत माहीती मिळताच सटाणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुभाष अनमुलवार यांच्यासह त्याच्या सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली.
हेही वाचा -Extortion Case : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या नावाने 50 लाखाची खंडणी; तिघांना सुरतमधून अटक