नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोना बाधित 3 देशातून आलेल्या 3 लोकांना महानगरपालिका आरोग्य विभागाने अपल्या देखरेखीत ठेवले आहे. त्यांची रोज आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत तपासणी होत असून आरोग्य विभाग या तिघांसंदर्भात विशेष काळजी घेत आहे. या तिघांना कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणं दिसली नाहीत. मात्र, ते कोरोना बाधित देशातून आले असल्याने काळजी म्हणून त्यांची रोज तपासणी केली जात आहे.
मालेगाव शहरात 21 फेब्रुवारी रोजी एक विध्यार्थी चीनच्या वुहान शहरातून भारतात आला. त्यास प्रथम हरियाणा येथे सन्य हॉस्पिटलमध्ये पूर्ण तपासणीसाठी ठेवण्यात आले होते. संपूर्ण तपासण्या सामान्य आल्यानंतर त्यास मालेगाव येथे आणण्यात आले. मालेगाव आरोग्य अधिकारी त्याची रोज तपासणी करत आहेत. दुसरा एक व्यक्ती हा ऑस्ट्रेलियाहून भारतात येतांना हाँगकाँग येथे 10 तास विमानतळावर थांबला होता, म्हणून त्याचीही दररोज तपासणी केली जात आहे. तर, तिसरा व्यक्ती इराणहुन परतला असल्याने त्याचीदेखील काळजी घेतली जात आहे.
आरोग्य अधिकारी डॉक्टर सायका अन्सारी आणि डॉक्टर त्रिभुवण आपल्या स्टाफसह या तिघांच्या घरी जाऊन विषेश लक्ष देत आहे. या तिघांपैकी कुणालाही कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली नसली तरीही, खबरदारी म्हणून त्यांची काळजी घेतली जात असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे. यासोबतच शहरात आरोग्य विभागाकडून अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण
हेही वाचा - 'दिल्ली हिंसाचारामागे काँग्रेसचा हात?'... उध्दव ठाकरेंना आठवलेंची ऑफर