ETV Bharat / state

दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून 3 तोळे सोन लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Nov 10, 2021, 3:33 PM IST

Updated : Nov 10, 2021, 3:42 PM IST

शेवाळे यांना बोलण्यात गुंतवत गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची माळ व एक तोळ्याची कानातील दागिने पॉलिश करण्यासाठी हातात घेत घेतले. यावेळी चोरट्यांनी शेवाळे यांच्या हातात पावडर दिली. या पावडरमुळे त्यांना गुंगी आली. नंतर लगेचच चोरांनी दोन तोळ्याची सोन्याची माळ व एक तोळ्याचे कानातील दागिने घेऊन मोटरसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात प्रदीप व ललिता शेवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

चोरी
चोरी

नाशिक - दिवाळी सणाची संधी साधत सटाणा तालुक्यातील ठेंगोडा (Thengoda Satana) येथे सोने-चांदीला पॉलिश करण्याचा (gold ornaments theft) बहाणा करून प्रदीप शेवाळे यांच्या कुटुंबाचे तीन तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरांनी दोन तोळ्याची सोन्याची माळ व एक तोळ्याचे कानातील दागिने घेऊन मोटरसायकलवरून पसार झाले. ही घटना सीसीटीव्ही (caught in CCTV) कैद झाली आहे.

दागिन्यांना पॉलिश करण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून 3 तोळे सोन लंपास

पॉलिश पावडर विक्रेता असल्याचे कार्ड दाखवत ललिता शेवाळे यांना चांदी व पितळाच्या भांड्याला पॉलिश करून देतो, असे सांगत दोन अनोळखी व्यक्ती आले. सुरुवातीला चांदीच्या मूर्तीला पॉलिश करून दिली. त्यानंतर बोलण्यात अडकवून पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. शेवाळे यांना बोलण्यात गुंतवत गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची माळ व एक तोळ्याची कानातील दागिने पॉलिश करण्यासाठी हातात घेत घेतले. यावेळी चोरट्यांनी शेवाळे यांच्या हातात पावडर दिली. या पावडरमुळे त्यांना गुंगी आली. नंतर लगेचच चोरांनी दोन तोळ्याची सोन्याची माळ व एक तोळ्याचे कानातील दागिने घेऊन मोटरसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात प्रदीप व ललिता शेवाळे यांनी तक्रार दाखल केली आहे.

सहा महिन्यांत एकाच घरात दुसरी घटना

प्रदीप शेवाळे यांच्या घरात सहा महिन्यांत दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी शेवाळे यांच्या घरासमोर लावलेली सायकल चोरून नेली होती. या घटनेत शेवाळे यांचा मोठा ऐवज गेला असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत. चोरटे परिसरातील इतर नागरिकांची देखील फसवणूक करू शकतात म्हणून नागरिकांनी सावध राहावे, असे शेवाळे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमकडून प्रभाकर साईलची 11 तासांहून अधिक चौकशी

Last Updated : Nov 10, 2021, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.