नाशिक: संशयित युक्ता रोकडे हिने तिची तीन महिन्यांच्या मुलगी ध्रुवांशी हिच्या हत्येचा बनाव रचला होता. मात्र, तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी तिच्यावर संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांसह युक्ताच्या नातलगांनी तिची चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नियोजन पूर्व हत्या? तीन महिन्यांची मुलगी ध्रुवांशी घरात खेळत असताना तिची आई युक्ता हिने तिच्याच मुलीची हत्या केली. यानंतर ती बेशुद्ध झाल्याचा बनाव केला होता. युक्ता रोकडे हिने नियोजनपूर्व ही हत्या केल्याचे समोर आले. वैद्यकीय तपासणीत ती मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचेही पोलिसांनी सांगितले. मात्र ध्रुवांशीच्या जन्मापूर्वी तिचा झालेला गर्भपात आणि जन्मानंतर मद्याच्या आहारी गेलेला पती यामुळे युक्ता रोकडे ही संतापली होती. तिच्यातील द्वेष भावनेचे कारण जाणून घेण्यासाठी ती मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले.
'हा' केला होता बनाव: मी माझ्या घरात माझी तीन महिन्यांच्या मुली सोबत होती. माझी सासूबाई माझ्या मुलीला दूध आणण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. अचानक एक अनोळखी पंजाबी ड्रेस घातलेली महिला माझ्या घरात आली. तिने माझ्या तोंडाला रुमाल लावला आणि मी बेशुद्ध झाले. माझ्या घरच्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या दोन-तीन तासांनंतर मी शुद्धीवर आली. त्यानंतर मला समजले की, माझ्या मुलीची हत्या झाली आहे. माझ्या मुलीची हत्या झालेल्या त्या महिलेला पोलिसांनी लवकरात लवकर शोधून तिला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या आईने केली होती.
जालन्यातही अशीच हत्या: जालना शहरातील मंठा रोडवरील चौधरी नगरात साडेपाच वर्षाच्या बालिकेचा खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (28 नोव्हेंबर, 2022) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मंठा रोडवर असलेल्या चौधरी नगर भागात ईश्वरी रमेश भोसले (वय साडेपाच वर्षे) ही काकाकडे शिकण्यासाठी आली होती. 11 जून 2022 रोजी तिच्या घराजवळच असलेल्या स्वरूप इंग्लिश स्कूलमध्ये तिचा प्रवेशही झाला होता.
चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात: ईश्वरीचे आई वडील घनसांवगी तालुक्यातील गुंज येथे शेती करतात. ईश्वरीला आई वडीलांनी काका गणेश भोसले यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले होते. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चौधरी नगर भागातील तिसर्या मजल्यावर राहणार्या गणेश यांच्या बाथरूममध्ये ईश्वरी मृतावस्थेत दिसून आली. तिच्या दोन्ही हातावर आणि गळ्यावर जखमा झालेल्या होत्या. अशा अवस्थेत तिला मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.