ETV Bharat / state

नाशकात पाण्याची टाकी कोसळून ३ ठार; ३ गंभीर - कोसळली

नाशकातील गंगापूर रस्त्यावरील सोमेश्वर कॉलनी येथे सकाळी पाण्याची कोसळून ३ मजूर ठार झाले आहेत. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

घटनास्थळाची पाहणी करताना नाशिक आयुक्त विश्वास नांगरे पाटील व पथक
author img

By

Published : Jul 2, 2019, 11:19 AM IST

Updated : Jul 2, 2019, 1:47 PM IST

नाशिक - गंगापूर रोड येथील धृवनगर परिसरात आपना घर या बांधकाम प्रकल्पात आज सकाळी साडेआठ वाजता सुमारास पंधरा हजार लिटर क्षमतेची वीस फूट उंचीची जलकुंभ अचानकपणे कोसळले. यात तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय तर तिघे गंभीरपणे गंभीर जखमी झाले आहे.

थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी आणि आयुक्त नांगरे पाटील यांची प्रतिक्रिया

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गंगापूर-सातपूर रोड जवळील धृवनगर येथे नाशिक मधील सम्राट ग्रुप या बांधकाम व्यावसायिकाचा अपना घर या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसाठी २ जलकुंभ तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आले होते. त्यापैकी एक जलकुंभात गळती लागलेली असल्यामुळे ते संपूर्ण जलकुंभ आज सकाळी कोसळले. यावेळी काही पुरुष मजूर जलकुंभ लगत आंघोळ करत होते. तर काही महिला भांडी धुवत होत्या. घटनेत जलकुंभाच्या मालब्याखाली दाबून मोहम्मद बारीक (रा. बिहार), बेबी खातून (रा. बिहार), सुदाम बारी (रा.बिहार)यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याची माहिती मिळताच नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दोषी आढळल्यास बांधकाम व्यावसायिकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणार आहे.

Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश

गंगापूररोडवरील सोमेश्वर कॉलनीलगत असलेल्या अपना घर या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पातील पाण्याची टाकी कोसळून तीन मजूरांची दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.