ETV Bharat / state

नदीपात्रात बैलगाडी उलटून तिघींचा मृत्यू, पुराच्या पाण्यात गाडी उलटल्याने झाली दुर्घटना - Three die in flood water

नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथे पुराच्या पाण्यात वाहून तीघींचा मृत्यू ( Three die in flood waters ) झाला आहे. पाऊस येत असल्यामुळे घरी जात असताना बैलगाडी उलटून तिघी पाण्यात पडल्या आणि काही क्षणातच बुडाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ नागरीकांनी मदतकार्य सुरू केले. यात तिघींचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Three killed
Three killed
author img

By

Published : Jun 25, 2022, 10:32 AM IST

नांदगांव - नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथे पुराच्या पाण्यात वाहून तीघींचा मृत्यू ( Three die in flood water ) झाला आहे. यात महिलेसह दोन मुलींचा समावेश आहे.पाऊस येत असल्यामुळे घरी जात असताना बैलगाडी उलटल्यान ( bullock cart overturned due to rain ) तिघी पाण्यात पडल्या आणि काही क्षणातच बुडाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ नागरीकांनी मदतकार्य सुरू केले. यात तिघींचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नांदगांव तालुक्यातील बोलठाण येथील रहिवासी असलेल्या मिनाबाई दिलीप बहिरव ( वय ४५ ) , पुजा दिनकर सोनवणे ( वय १५ ) आणि साक्षी अनिल सोनवणे ( वय ११ ) या तिघींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.आपल्या शेतातून बैलगाडीतून घरी जातांना अचानक पुराचे पाणी वाढल्याने बैलगाडी उलटली व यात या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. यात दोघींचे मृतदेह सापडले आहेत. तिसरा मृतदेह हाती आला नसून शोध कार्य सुरू आहे. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

घाटमाथ्यावर कायम पूरपरिस्थिती - नांदगांव तालुक्यातील जातेगाव बोलठाण या भागात नेहमी पावसाळ्यात पूरस्थिती ( Flood situation In Rainy Season ) निर्माण होते. परिणामी यावेळी रस्ता बंद होतो. नागरिकांच्या या अडचणीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे आणि याचा कायमस्वरूपी उपाय करायला हवा असं मत नागरिकांनी मांडले आहे.

हेही वाचा - Maharashtra political crisis :शिंदे गट महाविकास आघाडीचा काढणार पाठिंबा, राज्यपालांना पत्र देण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.