नाशिक- जिल्ह्यात आता पर्यंत 6 हजार 132 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी 24 तासात 336 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एकट्या नाशिक शहरातील 205 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिककरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे 3 हजार 127 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 2 हजार 323 रुग्ण उपचार घेत आहे. आता पर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यात 298 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार 807 संशयितांचे कोरोना स्वॅब तपासण्यात आले. त्यातील 18 हजार 928 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 6 हजार 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. निगेटिव्ह अहवालाचे प्रमाण 73.34 टक्के तर पॉझिटिव्ह अहवालाचे प्रमाण 23.39 टक्के आहे. 842 जणांचे अहवाल प्रलंबित असून त्याचे प्रमाण 3.26 टक्के इतके आहे.
ग्रामीण भागात वाढतोय कोरोनाचा संसर्ग
नाशिक ग्रामीण: 72..
सिन्नर :72
दिंडोरी:48
निफाड :74
देवळा :24
नांदगाव :57
येवला :52
त्र्यंबकेश्वर :24
कळवण: 5
बागलाण:32
इगतपुरी :43
मालेगाव ग्रामीण:51