ETV Bharat / state

देवळाली रेल्वे स्थानक उडवून देण्याची पत्राव्दारे धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क - लष्करी छावणी

देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राव्दारे मिळाली आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासनासह स्थानिक पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.

देवळाली रेल्वे स्थानक
author img

By

Published : Feb 18, 2019, 2:38 PM IST

नाशिक - देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राव्दारे मिळाली आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासनासह स्थानिक पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. याची खबरदारी म्हणून नाशिक बॉम्ब शोधक पथकाकडून देवळाली रेल्वे स्थानकाचा परिसर श्वान तसेच धातुशोधकाच्या मदतीने तपासण्यात आला.

सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की आयुक्तालयाला निनावी पत्राव्दारे २ दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी मिळाली. या पत्राची दखल घेत आयुक्तालयाकडून तातडीने बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने रेल्वेपरिसर तपासण्यात आला. १७ फेब्रुवारीला रविवारी हे पथक देवळाली रेल्वे स्थानकात दुपारी दाखल झाले. पथकाकडून श्वानांमार्फत संपुर्ण परिसर तपासण्यात आला. तर पोलिसांच्या १० जणांच्या टीमने रेल्वे स्थानकावरील कचराकुंड्या, अडगळीच्या जागा धातुशोधक यंत्राद्वारे तपासले. सुमारे तासाभरापेक्षा अधिक वेळ रेल्वे स्थानकाची तपासणी पथकाने केली. मात्र, कोठेही कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याचा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे. तसेच आयुक्तालयाकडून रेल्वे सुरक्षा पोलिसांनाही याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

देवळाली कॅम्प हा लष्करी छावणीचा परिसर असून या ठिकाणी आर्टिलरी स्कूल हे भारतीय सैन्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली असून, कुठल्याही प्रकारे या पत्राकडे दुर्लक्ष न करता यंत्रणा सतर्क झाली आहे. या निनावी पत्रामुळे रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

undefined

पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क -
धमकीचे निनावी पत्र जरी आयुक्तालयाला प्राप्त झाले असले तरी, पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अनुसूचित घटना घडू यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. हे निनावी पत्र कोणी पाठवले या बाबत देखील पोलीस यंत्रणा करत आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.

देवळाली रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी,पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्र...

देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्र
आली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा व रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासन सतर्क झाले.ह्या पत्राची गंभीर दखल घेत
तत्काळ बॉम्ब शोधक नाशक पथकाकडूनदेवळाली  रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाह्याने आणि धातुशोधक यंत्राद्वारे तपासण्यात आला.

सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आयुक्तालयाला निनावी पत्र प्राप्त झाले. त्या पत्रात दोन दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी पत्रात देण्यात आली होती. यानुसार आयुक्तालयाकडून तातडीने बॉम्बशोधक नाशक पथकाला आदेश देण्यात आले. 17 फेब्रुवारी ला रविवारी हे पथक  देवळाली रेल्वे स्थानकात दुपारी दाखल झाले. तसेच रेल्वे सुरक्षा पोलिसांनाही याबाबत आयुक्तालयाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. पथकाकडून श्वानांमार्फत संपुर्ण परिसरात पिंजून काढण्यात आला. पोलिसांच्या 10 जणांच्या टीम ने रेल्वे स्थानकावरील कचराकुंड्या, अडगळीच्या जागा धातुशोधक यंत्राद्वारे तपासण्यात आल्या. सुमारे तासाभरापेक्षा अधिक वेळ रेल्वे स्थानकाची तपासणी पथकाकडून सुरू होती; मात्र कोठेही कुठल्याहीप्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याचा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे. 
देवळाली कॅम्प हा लष्करी छावनीचा परिसर असून याठिकाणी आर्टीलरी स्कूल हे भारतीय सैन्याचे अतिमहत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली असून कुठल्याहीप्रकारे या पत्राकडे दुर्लक्ष न करता यंत्रणा सतर्क असून संपुर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर पिंजून काढण्यात आला आहे. तसेच रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस यंत्रणेमार्फत सुरक्षाव्यवस्था वाढविली गेली आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क
धमकीचे निनावी पत्र जरी आयुक्तालयाला प्राप्त झाले असले तरीदेखील पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. यामुळे नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून देखील या पत्राची गंभीर दखल घेत तातडीने रेल्वे स्थानक परिसराची तपासणी बॉम्ब शोधक-नाशक पथकामार्फत रविवारी करण्यात आली. तसेच रेल्वे पोलिसांनाही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.आंतरदेशीय पोस्टकार्ड द्वारे दोन ओळीचा मजकूर असलेले पत्र आयुक्तालायला प्राप्त झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून रेल्वे स्थानक बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपासले,हे निनावी पत्र कोणी पाठवले ह्या बाबत देखील पोलीस तपास काइत असून तपासा अंतीकुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये असं आवाहन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केलं आहे..
टीप सोबत फोटो जोडला आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.