नाशिक : भारतीय सैन्य दलात चार वर्षासाठी सेवा बजावण्याची (protect country) संधी अग्निपथ या योजने अंतर्गत (Agneepath Yojana) तरुणांना देण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्रातील नाशिकच्या आर्टिलरी सेंटर अहमदनगरच्या सैनिकी केंद्र पुणे येथील सैनिकी केंद्र तसेच नागपूर येथे अग्निवीर म्हणून दाखल होणाऱ्या सामान्य तरुणांना सैनिक (Thousands of Soldiers) म्हणून घडवले जात आहे. यासाठी नाशिकच्या अल्टिलरी सेंटरमध्ये अग्निविर रिसेप्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रातून त्यांचे बायोमेट्रिक तपासणीपासून ते सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येते. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलाच्या कारकिर्दीवर प्रकाश झोत टाकणारा लघुपट दाखविला जातो. या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सैनिक अधिकारी त्यांची मुलाखत घेऊन नेमणूक करतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं खडतड प्रशिक्षण (Soldiers Training) सुरू होतं.
31 आठवड्यांचे प्रशिक्षण : नाशिकच्या तोफखाना केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱ्या अग्निवीरांना भारतीय सैन्यात तोफा चालवणारा गनर, रेडिओ ऑपरेटर, तांत्रिक सहाय्यक, मोटर ड्रायव्हर या चार महत्त्वाच्या पदांवर सेवा बजवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मूलभूत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. यामध्ये 10 आठवड्याचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण व 21 आठवड्यांचे ॲडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे. एकूण 31 आठवड्यांचे प्रशिक्षण कालावधी राहणार असल्याचं लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशी आहे अग्निपथ योजना : भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर असे संबोधनार. तरुणांना चार वर्षासाठी भारतीय सैन्यात नोकरी मिळणार. अग्निवीर होण्यासाठी तरुणांची वयोमर्यादा 17 ते 23 वर्ष असावी. तीन वर्षाच्या नोकरी काळात 30 हजार रुपये मासिक वेतन. अखेरच्या वर्षात 40 हजाराचे मासिक वेतन. चार वर्षाच्या सेवापूर्ती नंतर 11 लाख 72 हजार रुपयांचे निधी पॅकेज. अग्निवीर शहीद झाल्यास एक करोड रुपयांचे अर्थ सहाय्य. सेवाकाळात अपंगत्व आले तर 44 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे.
इच्छा पूर्ण झाली : माझी सैन्यात जाण्याची लहानपणापासून इच्छा होती. अग्निपथ योजना अंतर्गत ती पूर्ण झाली. आज मी सर्व परीक्षा पास करून ट्रेनिंग घेतोय. देशाची सेवा करायला मिळाली याचा आनंद आहे. लष्कराच्या वतीने इतर सर्व सुख सुविधा दिल्या जात असून; काही दिवसानंतर आम्ही अग्निवीर म्हणून देशसेवेसाठी सैन्यात दाखल होऊ असं मनीष कुमार या अग्निविराने सांगितले.
2600 अग्निवीरांना सैन्याचं प्रशिक्षण : भारतीय सैन्य दलात सेवा बजावण्यासाठी इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निविरांची भरती करण्यात येत आहे. देशभरातून 25 हजार तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे, याच अंतर्गत नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये 2600 अग्निवीरांना सैन्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.