ETV Bharat / state

विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू; नाशिकमधील घटना - nashik news

चोरी करत असताना विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली. शहरातील अडगाव नाका परिसरात हा चोर चोरी करण्यासाठी आला होता. चोरी करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू
author img

By

Published : Aug 13, 2019, 6:25 PM IST

नाशिक - चोरी करत असताना विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शहरातील अडगाव नाका परिसरात हा चोर चोरी करण्यासाठी आला होता. चोरी करत असताना विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.

विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू

नाशिकच्या आडगाव नाका परिसरात केळकर वाडीतील एका इमारतीजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. हा व्यक्ती मृत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह विजेच्या डीपीच्या खालच्या बाजूला पडलेला होता. बाजूलाच असलेल्या अल्युमिनियमच्या पट्ट्या पसरलेल्या अवस्थेत होत्या. रात्रीच्या वेळी याच पट्ट्या चोरी करण्यासाठी हा चोर आला होता. मात्र, पट्ट्या मोठ्या असल्याने विजेच्या तारेला लागल्या आणि विजेचा धक्का लागून चोराचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयास्पद मृत्यू असल्याचा अंदाज पंचवटी पोलिसांनी व्यक्त करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

शवविच्छेदन अहवालातही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे समोर आले. हा चोर चोरी करण्याच्या उद्देशानेच आल्याचे समोर आले आहे. चोर खरच चोरीच्या उद्देशाने आला होता का ? खरोखर चोरीच करत असताना त्याचा मृत्यू झाला का? की इतर कारणांनी मृत्यू झाला हे पोलीस तपासात समोर येईलच. मृत चोराची अद्याप ओळख पटलेली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Intro:नाशिक शहरातील अडगाव नाका परिसरात एक चोर चोरी करण्यासाठी गेलेल्या असताना चोराला विजेचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे आडगाव नाका परिसरात एका सोसायटीमध्ये अल्युमिनियम धातूच्या पट्ट्या चोरी करताना विजेच्या डीपीला धक्का लागून चोराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीयBody:फोटोत दिसणारा हा अनोळखी मृतदेह...नाशिकच्या आडगाव नाका परिसरात केळकरवाडीतील एका इमारती जवळ आढळून आला.. मृत असल्याचे लक्षात येतात पोलिसांना त्याबाबत तेथील स्थानिकांनी माहिती दिली.. पोलिस घटनास्थळी पोहचले.. बघतात तर काय विजेच्या डीपीच्या खालच्या बाजूलाच त्याचा मृतदेह पडलेला होता.. बाजूलाच असलेल्या अल्युमिनियमच्या पट्ट्या पसरलेल्या अवस्थेत होत्या.. रात्रीच्या वेळी याच पट्ट्या चोरी करण्यासाठी आला होता.. मात्र पट्ट्या मोठ्या असल्याने विजेच्या तारेला लागल्या आणि त्यात त्याला विजेचा धक्का लागला आणि तो मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांना आला होता. मात्र अनोळखी आणि संशयास्पद मृत्यू असल्याचा अंदाज पंचवटी पोलिसांनी लावत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे समोर आलेय. शिवाय चोरी करण्याच्या उद्देशानेच तो आल्याचे समोर आलेय.

बाइट ०१ - कैलास पाटील - वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी
Conclusion:चोराची अद्याप ओळख पटलेली नसून त्यासाठीचा पुढील तपास पोलिस करत आहे. परिसरात या घटनेने भीतीचे वातावरण पसरलेय. चोर खरच चोरीच्या उद्देशाने आला होता का ? खरोखर चोरीच करत असतांना त्याला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला का ? इतर कारणांनी झाला याबाबत पोलिस तपासात समोर येणारच आहे. मात्र या चोराला चोरी करतांना झालेली चुक त्याच्या जीवाशी बेतलीय..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.