नाशिक - लष्कर भरतीची चुकीचा संदेश सोशल माध्यमावर दिल्याने अनेक बेरोजगार तरुण शहरात दाखल झाले. (Unemployed youth) मात्र, अशी कोणतीच भरती नसल्याचे पोलीस (Nashik police action) अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तरुणांना आल्या पावली माघे फिरावे लागले. (Misinformation about army recruitment) तरुणांनी सोशल माध्यमाच्या संदेशावर विश्वास न ठेवता खात्री करूनच भरतीसाठी यावे. सध्या अशी कोणतीच भारती नसल्याचे पोलिसांनी फलकावर सुचना दिली होती.
बेरोजगार तरुणांनी वेगवेगळ्या भागातून भरतीसाठी शहरात केली गर्दी
सोशल मेडीयावर देवळाली कॅम्प येथे लष्कर भरती होणार असा फसवा संदेश व्हायरल झाल्याने बेरोजगार तरुणांनी वेगवेगळ्या भागातून भरतीसाठी शहरात गर्दी केलीच. (Wrong message of army recruitment on social media) मात्र, येथे आल्यानंतर अशी भरती नसल्याचे समजताच अनेकांनी जड पावलांनी घराचा रस्ता धरला. शहरात यापूर्वीही चुकीच्या संदेशामुळे तरूणांची फसगत झाली होती. तरी पुन्हा तसाच अनुभव आल्याने तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
फसव्या व फेक संदेश वर विश्वास ठेऊ नये
लष्कराची देवळाली कॅम्प भागात कोणत्याही विभागाची भरती प्रक्रिया नाही. फेक व फसव्या संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. त्यावर तरुणांनी विश्वास ठेऊ नये असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले.
उमेदवारांनी घरी परत जावे अशी कोणती भरती नाही, फलक देवळाली कॅम्प भागात लावण्यात आला
दिनांक १६ ते १८ डिसेंबर रोजी टि. ए. बटालियनची नाशिक मध्ये मोठी सैन्य भरती अशा मचकुराचा फेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरी, भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांनी घरी परत जावे अशी कोणती भरती नसून याची नोंद घ्यावी असा फलक देवळाली कॅम्प भागातील मध्यवर्ती ठिकाणी झेंडा चौक येथे लावण्यात आला होता.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकार अन् राज्यपाल पुन्हा आमने-सामने, प्र-कुलगुरू निवडीवरून वाद