ETV Bharat / state

मालेगाव तालुक्यात एकाच रात्री दहा घरफोड्या; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

author img

By

Published : Jun 20, 2019, 4:39 PM IST

मालेगाव तालुक्यातील टेहरे, पाटणे आणि ब्राह्मणगाव या गावांमध्ये एकाच रात्री दहा पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या. त्यामुळे मालेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

नाशिक - मालेगाव तालुक्यातील टेहरे ,पाटणे आणि ब्राह्मणगाव या गावांमध्ये एकाच रात्री दहा पेक्षा अधिक घरफोड्या झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मालेगावातील घरफोड्यांमध्ये पाच ते सहा लाखाचे सोने आणि एक लाखाची रोकड चोरीला गेल्याचे समोर आले आहे. या गावांमध्ये मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी घराचे व दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट आणि तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली.

तीन मोटरसायकल वरून जवळपास दहाजणांची टोळी तोंडाला कापड बांधून व हातात लोखंडी रॉड घेऊन परिसरात दाखल झाली. त्यानंतर त्यांनी घरांची कुलूपे तोडून चोरी केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फाँरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

वारंवार दरोड्यांच्या घटना घडत असल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे होणाऱ्या चोरीच्या घटनांनी मालेगाव पोलीस दलाचा नाकर्तेपणा उघडकीस आला आहे. चोरट्यांवर वचक नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Intro:मालेगाव तालुक्यातील टेहरे ,पाटणे, ब्राह्मणगाव या गावांमध्ये एकाच रात्री दहा पेक्षा अधिक घरफोड्या झाल्याने मालेगाव तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Body:या घरफोड्या मध्ये पाच ते सहा लाखाचे सोनं आणि एक लाखाची रोकड चोरीला गेल्याचं समोर दिसून येत आहे या गावांमध्ये मध्यरात्रीनंतर दरोडेखोरांनी घराचे व दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाट आणि तिजोरीमध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोकड लंपास केलीय

Conclusion:प्रत्यक्षदर्शी महिले ने सांगितले की तीन मोटर सायकल वरून दहा लोक तोंडाला कपडे बांधून हातात लोखंडी रॉड घेऊन कुलूप तोडत असल्याची माहिती सागीतली.. पोलिसांनी फाँरेन्सिक टीम आणि स्वान पथकाला प्रचारण करून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू केला आहे वारंवार दरोड्यांचा घटना घडत असल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी मालेगाव पोलिस दलाला नाकर्तेपणा उघडकीस आला आहे चोरट्यांवर वचक नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर नागरिकनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.