ETV Bharat / state

टेम्पोच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू; नाशिकच्या दिंडोरी येथील प्रकार - Tempo-bike accident nashik latest news

नाशिककडून येणाऱ्या यवतमाळ येथील अशोक लेलैंड टेम्पो (क्र. एमएच २५ जे. १६८८) हा गुजरातकडे जात असताना पेठकडून येणारी मोटरसायकलला क्र. (एमएच १५ बीयु ४२०४) जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, मोटरसायकलसह युवकाची बॉडी १०० फूटावर फरफटत गेली.

Dead hushar dhatrak
मृत तुषार धात्रक
author img

By

Published : Jun 1, 2020, 5:51 PM IST

दिंडोरी (नाशिक ) - नाशिककडून येणाऱ्या टेम्पोने मोटरसायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात एक युवक जागीच ठार झाला आहे. ही घटना तालुक्यातील उमराळे (बु.) येथील गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावर घडली. तुषार विश्वनाथ धात्रक (वय - २७) असे मृताचे नाव आहे.

नाशिककडून येणाऱ्या यवतमाळ येथील अशोक लेलैंड टेम्पो (क्र. एमएच २५ जे. १६८८) हा गुजरातकडे जात असताना पेठकडून येणारी मोटरसायकलला क्र. (एमएच १५ बीयु ४२०४) जोरदार धडक दिली. या अपघातात उमराळे (बु) येथील तुषार विश्वनाथ धात्रक (वय - २७) याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, मोटरसायकलसह युवकाची बॉडी १०० फूटावर फरफटत गेली.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच, उमराळे बु. आऊट पोस्टचे पोलीस नाईक शरद भोये, आंनदा भोये यांनी पंचनामा केला. याबाबत पुढील तपास दिडोंरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.