नाशिक - इगतपुरी तालुक्यातील ओंडली गावातील शेतकरी गणेश कांबळे शेतात गेले असता त्यांना भाताच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आला. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ४ ते ५ दिवसांपूर्वी बिबट्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्यापही मृत्यूचं कारण स्पष्ट झालेले नाही.
शेतात जनावरे चारायला गेलेल्या गणेश कांबळे यांना एका भाताच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला. ही माहिती त्यांनी गावातील पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बालावले आणि पंचनामा केला. बिबट्याचे शवविच्छेदन इगतपुरी येथील घाटणदेवी परिसरातील वन विभागाच्या ठिकाणी करण्यात येणार असून त्यामध्ये मृत्यूचे स्पष्ट कारण समोर येईल असे वन विभागाने सांगितले आहे.
नाशिक मुंबई महामार्गावरील इगतपुरी घोटी भागात नेहमीच बिबट्याचा वावर असतो, १५ दिवसांपूर्वीच वाडीवरे येथे ट्रकच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता.