नाशिक : दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. (Threatened to kill disabled woman) अशीच एक घृणास्पद घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जय भवानी रोडवरील एका वस्तीत पत्र्याच्या खोलीत एक वृद्ध दिव्यांग महिला राहते. (raped disabled woman) रात्रीच्या वेळी ती दरवाजाला आतमधून वीट लावून व सर्व दिवे बंद करून झोपी जाते. (took nude photos of disabled woman) घटनेच्या रात्री शेजारी राहणाऱ्या भावाच्या मुलाने तिला जेवण आणून दिले. (arrested suspected rapist) जेवण करून वृद्ध दिव्यांग महिला झोपली असताना रात्री एक वाजेच्या सुमारास दरवाजा उघडून अज्ञात तरुण तिच्या खोलीत आल्याचे लक्षात आले. महिलेने कोण आहे, अशी विचारणा केली. (Nashik Crime)
पीडितेचे आपत्तीजनक फोटो काढले : त्याच भागात राहणाऱ्या संशयित साहिल आवारे (वय 22) याने पीडित महिलेचे तोंड दाबून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला तर मारून टाकेल अशी धमकी देऊन दिव्यांग महिलेवर अत्याचार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तूच मला बोलवले असल्याचा दम देत पीडित महिलेसोबत नग्न अवस्थेत फोटो काढून तो तेथून फरार झाला.
आरोपीला अटक : ही घटना पीडित महिलेने तिचा भाऊ सकाळी आठ वाजता चहा देण्यासाठी आला असता त्याला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी तात्काळ उपनगर पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून संशयित साहिल आवारे याला अटक करण्यात आली आहे. वयोवृद्ध दिव्यांग महिलेवर अत्याचार झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
या घटनेने खळबळ : नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या गावात एका गतिमंद विवाहितेवर 21 डिसेंबर, 2019 रोजी चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली होती. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती. दीपक काशिराम पवार, दीपक आनंदा पवार, सुरेश शिवराम शेवरे, अशोक पुनाजी गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची होती. सर्व संशयित 20 ते 25 वयोगटातील असून मद्यपान करून त्यांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
शेतात नेऊन सामूहिक बलात्कार : चार आरोपींनी गतिमंद विवाहितेस फूस लावून गावाच्या पश्चिमेस एका शेतात नेले. तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या बहिणीने सकाळी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. या बाबत पिडितेच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडखे यांनी केला होता.