ETV Bharat / state

कामयानी एक्सप्रेसला मनमाड स्थानकावर अचानक आग; प्रवाशांची धावपळ

ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

कामयानी एक्सप्रेसला आग
author img

By

Published : Apr 23, 2019, 7:57 PM IST

नाशिक - वाराणसीकडून मुंबईकडे जाणारी लोकमान्य टिळक कामयानी एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सोमवारी रात्री अचानक आग लागली. इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एस ११ व बाजूच्या दोन्ही बोगिंना आग लागल्याने प्रवाशांमध्ये धावपळ उडाली. यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते

ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेनंतर मनमाड स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मनमाड रेल्वे स्थानकामध्ये मुंबईकडे जाणारी कामायनी एक्सप्रेस येऊन पोहोचल्यानंतर काही काळात अचानकपणे बोगीच्या खालच्या बाजूला आग लागल्याची चर्चा सुरू झाली. यावेळी गाडीमध्ये प्रवास करणार्‍या काही प्रवाशांनी चालू गाडीमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासन या घटनेमागच्या कारणांचा शोध घेत आहे.

Intro:वाराणसी कडून मुंबईकडे जाणारी लोकमान्य टिळक कामायनी एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान काल रात्री अचानक पणे इंजिन पासून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एस 11 व बाजूच्या दोन्ही बोगिना आग लागल्याने प्रवाशांमध्ये धावपळ उडाली

Body:ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही एकंदरीत मनमाड रेल्वेस्थानकावर आलेल्या कामयानी एक्सप्रेस एस11 सह बाजूच्या दोन बोगिना लागलेल्या आगीमुळे गाडीतील प्रवाशांनी प्रत्यक्षदर्शींची ही एकच धावपळ उडाली अचानकपणे आलेल्या या प्रसंगाने मनमाड स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते

Conclusion:मनमाड रेल्वे स्थानकामध्ये मुंबईकडे जाणारी कामायनी एक्सप्रेस येऊन पोहोचल्यानंतर काही काळात येथील अचानकपणे खालच्या बाजूला आग लागल्याची चर्चा सुरु झाली गाडीमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना ही गाडी चालू झाल्यानंतर चालू गाडीमधून उड्या मारण्याचा प्रयत्न केला या गोंधळात अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे एकूणच ही आग का लागली या विषयी प्रवाशांमध्ये वेगवेगळे अंदाज बांधले जात असून रेल्वे प्रशासन या घटनेच्या कारणाचा शोध घेत आहे दरम्यान आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.