येवला ( नाशिक ) - येवला तालुक्यातील गोल्हेवाडी - सायगाव रस्ता तसेच त्या लगत असलेला जो शिवरस्ता आहे अशा दोन्ही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था ( Bad Condition Of Roads ) झाली असून अक्षरशः येथील 30 ते 40 शालेय विद्यार्थीसह परीसरातील ग्रामस्थांना चिखल तुडवत ( muddy roads ) तसेच पाण्यातून वाट काढत ये -जा करण्याची वेळ येत आल्याने रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थ ( Villagers ) करीत आहे. गेल्या दहा वर्षापासून रस्त्याची मागणी करून देखील संबंधित विभाग सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहे अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी ( villagers Angry reactions ) दिल्या आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी - येवला तालुक्यातील ( Yewla taluka ) गोल्हेवाडी ते सायगाव हा रस्ता दुरुस्तीची 2011 सालापासून मागणी करून देखील सुद्धा येथील रस्ता होत नसल्याने पावसाळ्यामध्ये या रस्त्याची मोठी दयनीय अवस्था होत असून पावसाचे पाणी साचल्याने मोठा चिखल व पाणी तुंबल्याने या गोल्हेवाडी गावातील विद्यार्थ्यांना या चिखलातून तसेच पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची वेळ येत आहे तर येथील नागरिकांना देखील मोठी कसरत करत ये - जा करावी लागत आहे. तसेच गोल्हेवाडी कडे येणारा शिवरस्ता आहे याची देखील मोठी दयनीय अवस्था झाली असून येथील विद्यार्थ्यांना गावात शाळेत येण्यासाठी नेहमीच आपल्या आई-वडिलांनासोबत घेऊन येण्याची वेळ येत आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी बाळंतीण असलेल्या महिलेला अक्षरशः ट्रॅक्टरमध्ये टाकून नेण्याची वेळ आली ( pregnent woman taken from tractor )होती. तरी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत असून रस्ता दुरुस्त न झाला तीव्र आंदोलन इशारा नागरिकांना दिला ( Villagers warned for agitation ) आहे.