नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात तब्बल दोन वर्षानंतर पाहिलेपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, प्रदीर्घ कालखंडानंतर विद्यार्थी पुन्हा शाळेत येणार असल्याने सुरवातीला शिक्षकांनी त्यांच्याशी संवाद साधावा, पहिला महिनाभर वेगवेगळ्या माध्यमातून मुलांचे समुपदेशन व्हावे आणि या नंतर विद्यार्थ्यांना शाळेची सवय झाल्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाला सुरवात करावी असं मत शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी 'ईटीव्ही भारता'शी बोलताना म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतर राज्य सरकार कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथिल करत आहे. पहिल्या टप्प्यात शहरांमधील आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्यानंतर आता येत्या एक डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे शहरी भागात पहिली ते सातवी पर्यंतचे तर ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आदींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घ्यावी -
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले घरातील आई, वडील, घरातील जवळचे व्यक्ती गमावल्यानं त्या तणावा मधून मुलं गेली आहेत. तसेच दोन वर्षे मुलांनी ऑन लाइन पद्धतीने शिक्षण घेतल्यानं मोबाइल, लॅब टॉप बघण्याचा स्क्रिनिग टाइम वाढला आहे. त्यामुळे हायपर डिसऑर्डर सारखे आजार वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. चिडचिड पणा वाढला आहे. तसेच तासनतास घरात राहून मुलांमध्ये आळशी पणादेखील आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होतं असली तरी सुरवातीचे काही दिवस शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना समुपदेशन करणं गरजेचं आहे, असं मतं शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी व्यक्त केलं.
शाळांनी काय करावे -
- विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा ठाव घेण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे.
- विद्यार्थ्यांसाठी शाळांनी सकारात्मक विषयावर कार्यक्रम घावे.या उपक्रमात शाळांनी सामजिक संस्था,डॉक्टर यांना सहभागी करून घावे.
- सरकारने या बाबत अध्यादेश कडून शाळांनी विद्यार्थ्यांसाठी काय कार्यक्रम राबवावे या बाबत विचार करावा