नाशिक - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून शिक्षक तरुणीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यामुळे या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तर निर्भया प्रकरणातील आरोपींना वेळेवर फाशी झाली असती तर, महिलांवरील होणारे हल्ले काही प्रमाणात कमी झाले असते, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील विद्यार्थिनींनी दिली आहे.
हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': 'जो जैसा कर रहा हैं उसको वैसी ही सजा मिलनी चाहिए'
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना येथील विद्यार्थिनींनी गेल्या काही दिवसांत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.
हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': आमच्या मुलींनी घराबाहेर पडायचे कसे?
तसेच पीडित तरुणीला लवकरात-लवकर न्याय मिळावा, खटला फास्ट ट्रक न्यायालयामध्ये चालावा, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थिनींनी दिली. समाजाने महिलाकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे, तसेच शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत, असे विद्यार्थिनींने सांगितले.