नाशिक - जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केलीआहे. सुरगाण्यात पहाटेच्या सुमारास अवैध मद्य साठ्याचा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कारवाईत 60 लाख रुपयांचे अवैध मद्य जप्त
मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून नाशिक जिल्ह्यामध्ये अवैध प्रकारे दारूची वाहतूक होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही दिवसात कोट्यवधी रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. मात्र, तरीही मद्य वहातुकीच्या घटना काही कमी होताना दिसूत नाही. सोमवारी (दि. 21 डिसें.) पहाटेच्या सुमारास 60 लाख रुपयांचा दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण नजीक ही कारवाई करण्यात आली असून यात दारूचे बॉक्स असलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी पथकाची कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी पथकाने मिळालेल्या गुप्त माहिती नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यात 60 लाख रुपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. हा ट्रक दमनवरुन नाशिकमार्गे पुढे जाणार होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये पुन्हा हुडहुडी; तापमान 9.1 अंश सेल्सिअस, तर निफाडचा पारा 8.2 वर...
हेही वाचा - नाताळ उत्सवावर कोरोनाचे सावट; वयोवृद्ध आणि लहान मुलांना चर्चमध्ये प्रवेश नाही