नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. नाशिक जिल्ह्यात आचारसंहिता जाहीर झाल्यापासून 15 मतदार संघामध्ये अवैध मद्यसाठा, वाहन, रोख रक्कम, अवैध शस्त्रास्त्र असा एकूण एक कोटीपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या कारवाईत 50 लाख रुपयांची दारू आणि 15 लाख 50 हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या सर्व कारवायांतील 23 दोषींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक मुद्देमाल जप्त झाला आहे.
हेही वाचा - 'दाऊदसोबत संबंध असणाऱ्या राष्ट्रवादीशी काँग्रेसने युती कशी केली'
मासे वाहतुकीच्या नावाखाली वाघेरा येथे अवैध मद्याची वाहतूक करणारी बोलेरो गाडी सापळा रचून भरारी पथकाने ताब्यात घेतली. त्यातून लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. निवडणुकीच्या काळात वाढत्या अवैध मद्याच्या वाहतुकीला आळा घालण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे निर्माण झाले आहे.