ETV Bharat / state

Bus Fire In Nashik : चालती बस पेटली; चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले 35 प्रवाशांचे प्राण - ST Bus Fire

शहादा ते मुंबई जाणाऱ्या एस बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आज सकाळच्या सुमारास आग लागली. बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्याकडेला उभी करत, बसमधील 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.

Corporation Bus Fir
चालती बस पेटली
author img

By

Published : Jan 18, 2023, 3:43 PM IST

Updated : Jan 18, 2023, 4:30 PM IST

चालती बस पेटली; चालकाच्या सतर्कतेमुळे वाचले 35 प्रवाशांचे प्राण

नाशिक - राहुड घाटात चालत्या बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखल्याने 35 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आज सकाळच्या सुमारास आग लागली. बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बसमधील 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, नाशिक सिन्नर मार्गावर 13 जानेवारीला झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत अंबरनाथमधील 9 आणि कल्याणमधील एका साईभक्तांचा समावेश आहे. या घटनेने अंबरनाथजवळील मोरिवली गावात शोककळा पसरली आहे. अंबरनाथचे शिंदे गटाचे आमदार किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचबरोबर अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अपघातात ठार झालेल्याची नावे - नरेश मनोहर उबाळे. (वय ३०) त्यांची पत्नी वैशाली नरेश उबाळे (वय ३२) श्रद्धा सुहास बारस्कर ( वय ४) श्रावणी सुहास बारस्कर (वय ३०) या मायलेकींचा समावेश आहे. या चरासह आणखी दोन मोरवली गावात राहणारे होते. तर दीक्षा संतोष गोंधळी ( वय १८) हि तरुणी कल्याणमध्ये राहणारी होती. तर बस चालक बालाजी मोहंती (वय २५) असे अपघातात ठार झालेल्याची नावे समोर आली आहे.

मोरीवली गावात शोकाकुल वातावरण - मुंबई , अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर मधून काल रात्रीच्या सुमारास साई भक्त शिर्डीला देवदर्शनासाठी अपघात ग्रस्त बसने निघाले होते. या बस मध्ये एकूण 45 प्रवाशी प्रवास करीत होते. प्रवाशाने भरलेली खाजगी बस आज पहाटेच्या सुमारास परतीच्या प्रवाशाला निघाली असता, नाशिक सिन्नर मार्गावरील पाथरे गावाजनिक बस, ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 साई भक्तांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले यामध्ये 9 भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. तर एकाच वेळी गावातील तब्बल 9 जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा - Burning Bus In Thane टीएमटी बसला डेपोमध्ये आग: आगीमध्ये बस जळून खाक, डिझेल टँक न फुटल्याने अनर्थ टळला

Last Updated : Jan 18, 2023, 4:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.