नाशिक - दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
मागील वर्षी नाशिक जिल्हयात 6 लाख 8 हजार हेक्टरवर खरीप पिकाची लागवड करण्यात आली होती. तर यंदाच्या वर्षी 6 लाख 33 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, खरिपाचा पाऊस सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये. तसेच 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
याबरोबरच सर्वत्र खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांनी केले आहे.
- 2018-19 पेरणी झालेले लागवड क्षेत्र-
- भात - 86,806 हेक्टर
- मका- 2,11,846 हेक्टर
- कडधान्य- 38,186 हेक्टर
- सोयाबीन- 69,452 हेक्टर
- कापूस- 42532 हेक्टर
- 2019-20 प्रस्तवित लागवड क्षेत्र-
- भात - 88,000 हेक्टर
- मका- 2,25,000 हेक्टर
- कडधान्य- 32,320 हेक्टर
- सोयाबीन- 75,500 हेक्टर
- कापूस- 45,000 हेक्टर