ETV Bharat / state

Nashik Sinner Road Accident : नाशिक-सिन्नर अपघात; अंबरनाथमध्ले 9 तर कल्याणामधील १ ठार - 10 people have died in an early morning accident

नाशिक सिन्नर मार्गावर पहाटे झालेल्या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अंबरनाथमधील 9 आणि कल्याणमधील एक साईभक्तांचा समावेश आहे. या घटनेने अंबरनाथजवळील मोरिवली गावात शोककळा पसरली आहे. अंबरनाथचे शिंदे गटाचे आमदार किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचबरोबर अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Nashik Sinner Road Accident
नाशिक सिन्नर मार्गावर पहाटे झालेल्या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 13, 2023, 10:01 PM IST

Updated : Jan 13, 2023, 10:19 PM IST

नाशिक सिन्नर मार्गावर पहाटे झालेल्या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

ठाणे : नाशिक सिन्नर मार्गावर पहाटे झालेल्या अपघातात अंबरनाथमधील 9 तर, कल्याणमधील एका साईभक्ताचा समावेश आहे. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अंबरनाथजवळील मोरिवली गावातील 9 जणांचा समावेश आहे. तर कल्याणमधील एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोरवली गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे

अपघातात ठार झालेल्याची नावे - नरेश मनोहर उबाळे. (वय ३०) त्यांची पत्नी वैशाली नरेश उबाळे (वय ३२) श्रद्धा सुहास बारस्कर ( वय ४) श्रावणी सुहास बारस्कर (वय ३०) या मायलेकींचा समावेश आहे. या चरासह आणखी दोन मोरवली गावात राहणारे होते. तर दीक्षा संतोष गोंधळी ( वय १८) हि तरुणी कल्याणमध्ये राहणारी होती. तर बस चालक बालाजी मोहंती (वय २५) असे अपघातात ठार झालेल्याची नावे समोर आली आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे

मोरीवली गावात शोकाकुल वातावरण - मुंबई , अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर मधून काल रात्रीच्या सुमारास साई भक्त शिर्डीला देवदर्शनासाठी अपघात ग्रस्त बसने निघाले होते. या बस मध्ये एकूण 45 प्रवाशी प्रवास करीत होते. प्रवाशाने भरलेली खाजगी बस आज पहाटेच्या सुमारास परतीच्या प्रवाशाला निघाली असता, नाशिक सिन्नर मार्गावरील पाथरे गावाजनिक बस, ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 साई भक्तांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले यामध्ये 9 भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. तर एकाच वेळी गावातील तब्बल 9 जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.

Nashik Sinner Road Accident
अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

१२ जणांची प्रकृती गंभीर - मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खासगी बस तसेच शिर्डीकडून सिन्नरकडे जाणारा मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णतः चक्काचूर झाली. यामध्ये जवळपास ४५ प्रवाशी या बसमध्ये प्रवास करत होते. दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकांवर सिन्नर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये ३४ प्रवाशी जखमी झाले असून १२ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृत्यामध्ये आठ मृत प्रवाशांची ओळख पटली असून अद्याप दोन मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

देवदर्शनाला जातांना अपघात - अंबरनाथ नजीक मोरीवली गावचे रहिवासी एकूण १५ जण या बसेसने शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघाले होते, मात्र वाटेत भीषण संकटाला सामोरे जावे लागले. शिर्डीला जाताना झालेल्या बस अपघातातील जखमींवर शासकीय खर्चातून उपचार केले जात असून आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे.

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख - अंबरनाथचे शिंदे गटाचे आमदार किणीकर यांनी या अपघातानंतर मोरीवली गावात येऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्याचबरोबर अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.

Last Updated : Jan 13, 2023, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.