नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावात शनिवारी सायंकाळी सात वाजता घरात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या मुलावर बिबट्याने झडप टाकून उचलून ( six year old boy killed in leopard attack ) नेले. वन विभागाच्या पथकाने शोध घेतल्यानंतर अडीच तासाने अर्धा किलोमीटर दूर वाघेरा रस्त्यावर झाडा झुडपात मुलाचा मृतदेह ( boy dead bodyfound half kilometer away ) आढळला. हरीश निवृत्ती दिवटे असे मृत मुलाचे नाव आहे.
हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा ठार : मिळालेल्या माहितीनुसार हरीश आपल्या बहिणीसोबत घरात खेळत होता. त्यावेळी अचानक आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप टाकली. आपल्या जबड्यात हरिशला उचलत त्याने धूम ( Six year old boy killed in Nashik leopard attack ) ठोकली. बहिणीने आरडाओरडा केल्याने गोठ्यात दूध काढत असलेले आजोबा धावत आले. नंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी परिसरात शोध सुरू केला. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी व विवेक भदाणे हे घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा वाघेरा रस्त्यावर हरिशचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला ( cage installed to capture leopard ) आहे.
बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड,त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल.या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे बिबट्यांना लपण्यासाठी हि चांगली जागा असते. ऊसतोड करतांना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. अशात शेतकऱ्यांनी मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊस तोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी ज्यामुळे बिबटे,लांडगे,तरस वन प्राणी जवळ येणार नाही. अनेक वेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करतांना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी असे आव्हान वन विभागाने केले आहे.