ETV Bharat / state

नाशिक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक कोरोना पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 148 वर

5 कोरोनाबाधित रुग्ण येवला, तर एक 24 वर्षीय रुग्ण तळपाडे सुरगाणा येथील आहे. हा तरुण नाशिक जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवक आहे. हा रुग्ण नाशिकमधील आरटीओ कॉर्नर परिसरात राहत असून त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन घेत आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवकाला कोरोना

author img

By

Published : Apr 27, 2020, 9:51 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील मालेगावसह इतर तालुक्यात कोरोना विषाणू थैमान घालत आहे. अशात, जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 5 कोरोनाबाधित रुग्ण येवला, तर एक 24 वर्षीय रुग्ण तळपाडे सुरगाणा येथील आहे.

हा तरुण नाशिक जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवक आहे. हा रुग्ण नाशिकमधील आरटीओ कॉर्नर परिसरात राहत असून त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन घेत आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांचा आकडा 148 वर पोहोचला आहे. येवला व सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवकाला कोरोना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरी, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक शहरात 12 रुग्ण असून यातील एक रुग्ण बरा झाला आहे. मालेगावात 126 कोरोनाबाधित रुग्ण असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.