ETV Bharat / state

नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेना नगरसेवकांचे राजीनामा नाट्य?

author img

By

Published : Oct 15, 2019, 10:19 PM IST

नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना नगरसेवकांचे राजीनामा नाट्य हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकच्या 36 नगरसेवकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे.

shivsena corporaters resign issue

नाशिक - पश्चिम मतदारसंघातील शिवसेना नगरसेवकांचे राजीनामा नाट्य हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकच्या 36 नगरसेवकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. मात्र, नगरसेवक पदाचे राजीनामेच द्यायचे असल्यास ते महानगरपालिका आयुक्तांना देणे गरजेचे असताना ते पक्षप्रमुखांकडे का पाठवले? ह्या बाबत चर्चेला उधाण आले आहे.

यंदाची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक महायुतीतील बंडखोरांमुळे चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात 40 ते 45 ठिकाणच्या जागेवर भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. ह्या बंडखोरांची मनधरणी करणे देखील पक्षांना नाकीनऊ आले असल्याचे चित्र आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघ देखील याला अपवाद नाही.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादी 40 चा आकडाही पार करणार नाही - गिरीश महाजन

येथील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांनी उमेदवारी माघार घ्यावी, यासाठी सीमा हिरे यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या आणि खुद्द पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन सुद्धा हा तिढा सुटला नाही. विलास शिंदे यांनी देखील हा मतदारसंघ शिवसेनेचा गड असल्याचे म्हणत नाशिकमधील सर्वच शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवले आहे.

आज शहरातील शिवसेनेच्या 36 नगरसेवकांसह स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले आहेत. मात्र, नगरसेवकांना जर राजीनामेच द्यायचे होते तर त्यांनी ते महानगरपालिका आयुक्तांकडे देणेचे गरजेचे होते, यावरून हे शिवसेनेचे दबाव तंत्र आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मात्र, बंडखोरी करणाऱ्या विलास शिंदेंच्या उमेदवारीमुळे काही फरक पडणार नसून सेनेच्या उमेदवारा बरोबरच ह्या मतदारसंघात भाजपचे नगरसेवक असल्याचे महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - नाशकात युतीत बिघाडी, 36 सेना नगरसेवकांचे राजीनामे

खरंतर युती झाली हेच सर्वांना आश्चर्य करणारे होते, शिवसेना-भाजप सत्तेत असताना सुद्धा त्यांच्यात अनेक वेळा वाद झाले होते. नाशिक महानगरपालिकेत भाजप सत्तेत असून शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळेच शिवसेनेने भाजपला अनेक विषयांवरून कोंडीत पकडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाजप-सेना पूर्वी सारखे नैसर्गिक मित्र राहिले नसून
सेना नगरसेवकांना जर राजीनामे द्यायचे होते तर त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना देणे गरजेचे होत, त्यामुळे ही सेनेची नौटंकी असल्याचे मते जेष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांनी व्यक्त केले आहे.

शैलेंद्र तनपुरे, महाराष्ट्र टाइम्स संपादक, नाशिक

जळगावमध्ये 4 ठिकाणी गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवरांसमोर बंडखोरी केली असून ह्या बंडखोरांनी माघार घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना घेतली होती. जळगावात झालेल्या मोदींच्या सभेत त्यांना आपली भूमिका मोदींसमोर मांडू दिली नाही. त्यामुळे त्याला उत्तर म्हणून नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक झाली असावी, असे देखील तनपुरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी भाजप-सेनेमध्ये तणाव असून निकाल आल्यानंतरच युतीचे भवितव्य कळणार आहे.

Intro:नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेना नगरसेवकांचे राजीनामा नाट्य?

Body:नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या नगरसेवकांचे राजीनामा नाट्य? चांगलाच चर्चेचा विषय बनलाय..शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकच्या 36 नगरसेवकांन सह शिवसेना पदाधिकाऱयांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे..मात्र नगरसेवक पदाचे राजीनामेच द्यायचे असल्यास ते महानगरपालिका आयुक्तांना देणे गरजेचे असतांना ते पक्षप्रमुखा कडे का पाठवले ह्या बाबत चर्चेला उधाण आलं आहे...

यंदाच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक महायुतील बंडखोरांन मुळे चांगलीच रंगली आहे...महाराष्ट्रात 40 ते 45 ठिकाणच्या जागेवर भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचं हत्यार उपसले आहे..ह्या बंडखोरांची मनधरणी करणं देखील पक्षांना नाकीनऊ आलं असल्याचे चित्र आहे..नाशिक पश्चिम मतदारसंघ देखील याला अपवाद नाही,येथील महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडखोरी केली आहे..शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्या पासून त्यांनी उमेदवारी माघार घ्यावी सीमा हिरे यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या आणि खुद्द पक्ष प्रमाख उद्धव ठाकरे यांची भेटी घेऊन सुद्धा हा तिढा सुटला नाही,विलास शिंदे यांनी देखील हा मतदारसंघ शिवसेनाचा गड असल्याचे म्हणत नाशिक मधील सर्वच शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवले आहे..आज शहरातील शिवसेनेच्या 36 नगरसेवकांन सह स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठवले आहे..मात्र नगरसेवकांना जर राजीनामेचं द्याचे होते तर त्यांनी ते महानगरपालिका आयुक्तांन कडे देणेचे गरजेचे होते,यावरून हे शिवसेनेचे दबाव तंत्र आहे का असा प्रश्न देखील उपस्थीत होतं आहे..मात्र बंडखोरी करणारे विलास शिंदे यांच्या उमेदवारी मुळे काही फरक पडणार नसून सेनेच्या उमेदवार बरोबरच ह्या मतदारसंघात भाजपचे नगरसेवक असल्याचं महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी म्हटलं आहे...

खरंतर युती झाली हेच सर्वांना आश्चर्य करणारे होते,शिवसेना भाजप सत्तेत असतांना सुद्धा त्यांच्यात अनेक वेळा वाद झाले होते.नाशिक महानगर पालिकेत भाजप सत्तेत असून शिवसेना विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे..त्यामुळेच शिवसेनेने भाजपला अनेक विषयावरून कोंडीत पकडल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे भाजप सेना पूर्वी सारखे नैसर्गिक मित्र राहिले नसून
सेना नगरसेवकांना जर राजीनामे द्यायचे होते तर त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना देणे गरजेचं होत,त्यामुळे ही सेनेची नोटांकी असल्याचं मतं जेष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांनी व्यक्त केलं आहे..
जळगाव मध्ये 4 ठीकाणी गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवरांन समोर बंडखोरी केली असून,ह्या बंडखोरांनी माघार घ्यावी अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना घेतली होती,जळगावात झालेल्या मोदींच्या सभेत त्यांना आपली भूमिका मोदींन समोर मांडू दिली नाही त्यामुळे त्याला उत्तर म्हणून नाशिक मध्ये शिवसेना आक्रमक झाली असावी असं देखील तनपुरे यांनी म्हटलं आहे..महाराष्ट्रात सगळ्याच ठीकाणी भाजप सेना मध्ये तणाव असून निकाल आल्यानंतरच युतीचे भवितव्य कळणार आहे...
बाईट शैलेंद्र तनपुरे महाराष्ट्र टाइम्स संपादक नाशिक
सीमा हिरे वन टू वन....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.