येवला (नाशिक)- केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमध्ये केलेली दरवाढ, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य आणि सरकारकडून मंजूर करण्यात आलेले नवीन कृषी कायदे याविरोधात येवला तालुका शिवसेनेच्या वतीने विंचूर चौफुली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांकडून विविध मागण्या
रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान व चीनचा हात आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले, त्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच केंद्राकडून तयार करण्यात आलेले नवे कृषी कायदे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी देखील या आंदोलकांकडून करण्यात आली आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी या आंदोलनात सहभागी होत, रास्तारोको केला.