ETV Bharat / state

'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार' - संजय राऊत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका

महाविकास आघाडीला मिळत असलेले यश पाहता स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Dec 12, 2020, 3:22 PM IST

नाशिक - विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

नाशिक पत्रकार परिषद

स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असली तरी प्रमुख नेत्यांचा स्थनिक स्वराज संस्थेच्या निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय झाला असल्याचे राऊत म्हणाले. पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र आल्याने याचा नागपूर, पुणे ह्या ठिकाणी फायदा होऊन भाजपचा किल्ला ढासळला. म्हणून आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही एकत्रित लढवणार आहोत. मुंबई महापालिकेत सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना असून नाशिकमध्ये देखील सेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे महापौर हा शिवसेनेचाच होईल असेही राऊत म्हणाले. मुंबईत कोणीही कोणाबरोबर गेले तरी सत्ता शिवसेनेचीच राहणार असल्याचे म्हणत मनसे-भाजप एकत्र आली तरी काही फरक पडणार नसल्याचे राऊत म्हणाले.

शरद पवार पंतप्रधान व्हायला हवे होते..

पी. व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी खरे तर शरद पवार झाले असते. त्यांच्यावर अन्याय झाला. देशाचे नेतृत्व करण्याची सगळ्यात जास्त क्षमता शरद पवार यांच्यात असून त्यांचे कर्तृत्व हाच त्यांना मोठा अडथळा असून कमकुवत लोकांनी त्यांना कायम अडगळीत टाकले. 'संपुआ'चे नेतृत्व कोणी करावे ही चर्चा, निर्णय अद्याप झाला नसून शिवसेना संपुआमध्ये नाही, शरद पवार हे संपुआचे अध्यक्ष झाले तर स्वागतच आहे, असे राऊत म्हणाले. सक्तवसुली संचलनालय, सीबीआय यांनी भाजप कार्यकर्त्यासारखे वागू नये, माझ्याकडे भाजपच्या 120 लोकांची यादी आहे. ती मी ईडीला पाठवणार असून भाजप राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीचा वापर करत असल्याचे राऊत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.