ETV Bharat / state

युतीची चर्चा सुरू असताना शिवसेना पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत - sudam dhomase nashik news

शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याची सुरुवात म्हणून जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणत मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती.

युतीची चर्चा सुरू असताना शिवसेना पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
author img

By

Published : Sep 15, 2019, 7:32 PM IST

नाशिक - शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा सुरू असताना, नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. आज (रविवार) शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन बांधले. आजपासून शिवसेनेने पश्चिम मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे प्रचाराची सुरुवातच मिसळ पार्टीने केल्याने एकच चर्चा रंगली आहे.

युतीची चर्चा सुरू असताना शिवसेना पदाधिकारी स्वबळावर लढण्याच्या तयारीत

मिसळ गरम आहे, चेहरे मात्र नरम आहेत, भाऊ रस्सा थोडा कमीच वाढ युतीच वातावरण गरम आहे, अशी चर्चा मिसळ पार्टीत रंगली होती. भाजप शिवसेनेत अजूनही जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युती होणार का नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. पश्चिम मतदार संघ भाजपच्या वाट्यावर असला तरी शिवसेना त्यावर दावा करत आहे. मागील निवडणुकांमध्ये आम्ही गाफील राहिलो, मात्र आता तसे काहीही होणार नाही. आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत शिवसेना नगरसेवक सुदाम ढोमसे यानी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - शरद पवार सोमवारी नाशिक दौऱ्यावर; विधानसभानिहाय बैठकीचे आयोजन

नाशिकमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्याची सुरुवात म्हणून जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणत मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. दरम्यान, आगामी निवडणुकीत नाशिकमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेला गोंधळ दोन्ही पक्ष याग्य प्रकारे हाताळतात की, दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Intro:एकीकडे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा सुरू असताना,दुसरीकडे मात्र नाशिकमध्य शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर आगामी विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी सुरू केलीये...आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना डावलून आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात शिवबंधन बांधून पश्चिम मतदार संघाच्या प्रचाराच रणशिंग फुंकलय..विशेष म्हणजे प्रचाराची सुरवातच मिसळ पार्टीने केल्याने एकच चर्चा रंगलीये.....Body:मिसळ गरम आहे...चेहरे मात्र नरम आहेत,भाऊ रस्सा थोडा कमीच वाढ युतीच वातावरण गरम आहे..अशी चर्चा आज मिसळ पार्टीत रंगली..त्यामुळे सद्या राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप युती होणार का नाही याची चर्चा जोरदार सुरू आहे..कारण भाजप शिवसेनेत अजूनही जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे त्यामुळे नक्की काय होणार याच कोड मात्र उलगडलेलं नाही...मात्र नाशिकमधील शिवसेना पदाधिकार्यांनी आता स्वबळावर लढण्यासाठी जोरदार सुरुवात केली आहे..आपल्या जुन्या शिवसैनिकांना एकत्र आणत त्यांना शिवबंधन बांधून चटकदार मिसळ पार्टीच आयोजन केल होत..यात कार्यकर्त्यांनी चांगल्याच संख्यने हजेरी लावत मिसळवर ताव मारला..पश्चिम मतदार संघ भाजपच्या वाटेवर जरी असला तरी शिवसेना त्यावर आता दावा करत आहे..

बाईट : विलास शिंदे (नगरसेवक शिवसेना)

मागील निवडणुकांमध्य आम्ही गाफील राहिलो मात्र आता तस काही होणार नाही..आम्ही ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत अशी खूणगाठ शिवसेना कार्यकर्त्यांनी बांधल्याच शिवसेना नगरसेवक सुदाम ढोमसे यानी सांगितले

बाईट : सुदाम ढोमसे शिवसेना नगरसेवक
Conclusion:त्यामुळे आता नाशिकमधील शिवसेना पदाधिकारी युती पेक्षा स्वबळावर लढण्यासच जास्त इच्छुक असल्याचं दिसून येतंय..मात्र युती झाली तरी नाशिकमध्य जागा वाटपावरून सुरू असलेला गोंधळ कशा प्रकारे थांबबला जातोय..की दोन्ही पक्षांमध्य सुरू असलेला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येतोय हेच बघन महत्वाचं ठरणार आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.