ETV Bharat / state

Ajit Pawar Banner In Nashik: नाशिकमध्ये अजित पवार यांच्या बॅनरवरून दिवंगत यशवंतराव चव्हाण 'इन' आणि शरद पवार 'आउट' - नाशिकमध्ये अजित पवारांचे बॅनर

Ajit Pawar Banner In Nashik: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) हे एक दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर (Ajit Pawar Nashik tour) आले. त्यांच्या उपस्थितीत वणी, दिंडोरी, कळवण या भागात आमदारांनी केलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. अजित पवार यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनर्सने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. अजित पवार यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवरुन शरद पवार यांचं छायाचित्र गायब झालेलं पाहायला मिळालं. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे राजकीय गुरु दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात आलंय. मात्र, दिंडोरी लोकसभा मतदार संघ मात्र याला अपवाद ठरला. दिंडोरीमध्ये अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार यांचे फोटो देखील बॅनरवर झळकले.

Ajit Pawar Banner In Nashik
यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोला स्थान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 5:29 PM IST

नाशिक Ajit Pawar Banner In Nashik: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर कायम पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी याखेपेस मात्र शरद पवार यांचा एक आदेश शिरसावंद्य मानलाय. बंड करणाऱ्या नेत्यांनी स्वतःच्या बॅनरवर माझे फोटो लाऊ नये, असं निक्षून सांगणाऱ्या शरद पवारांच्या आदेशांचं पालन आजवर होताना दिसत नव्हतं. अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान हेही घडलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यासाठी जिल्हाभर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. यात काही बॅनरमध्ये शरद पवार यांना हटवून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला स्थान देण्यात आल्याचं दिसून आलं.

अजित पवारांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ: उपमुख्यमंत्री अजित पवार हे एक दिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांच्या उपस्थितीत वणी, दिंडोरी, कळवण या भागात आमदारांनी केलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ झाला. यासाठी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी करून वृत्तपत्रात जाहिराती दिल्या. यातल्या बहुसंख्य जाहिराती आणि बॅनर्सवर शरद पवार यांना हटवून यशवंतराव चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला स्थान दिल्याचं पाहायला मिळालं. दिंडोरी लोकसभा मतदार संघात मात्र अजित पवार यांच्याबरोबर शरद पवार यांचेच फोटो बॅनरवर झळकले. शरद पवार आणि अजित पवार यांनी पुन्हा एकत्र यावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावना आहे.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा फोटो: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यासाठी जिल्हाभर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. अशात भुजबळाचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि भुजबळ यांच्या अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून देखील शहर परिसरात बॅनर लावण्यात आले. मात्र, या बॅनरवर महापुरुषांच्या फोटोसह दिवंगत यशवंतराव चव्हाण 'इन' आणि शरद पवार 'आउट' झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल! राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. यात पहिली सभा त्यांनी भुजबळांच्या येवला मतदार संघात घेत भुजबळांना उद्देशून माझा निर्णय चुकला होता. आता मी ही चूक सुधारेन, असं म्हटलं होतं. यावर भुजबळांनी देखील शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरवरचं शरद पवार यांचं स्थान अबाधित राहिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कुणाची? पक्षाचं चिन्ह 'घड्याळ' कुणाला मिळणार? या वादाची सुनावणी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे सुरु असतानाच शरद पवार यांना बॅनरवरुन हटवून अजित पवार यांनी 'आर या पार' ची लढाई सुरु झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेही वाचा:

  1. Manoj Jarange On OBC: 'ओबीसीमध्ये यायचं असेल तर...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर
  2. Sanjay Raut on State Government: या सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत म्हणून मुख्यमंत्री नेहमी दिल्लीला जातात; राऊतांची राज्य सरकारवर जळजळीत टीका
  3. Ajit Pawar in Nashik: उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर; वाहनासमोर टोमॅटो-कांदे फेकून शेतकऱ्यांनी केला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.