नाशिक - 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. शहरात वाढलेली सिमेंटची जंगले, मोबाइल टॉवर यामुळे शहरात चिमण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यासाठी दरवर्षी चिमणी दिनाच्या निमित्ताने विविध शाळांना भेटी देऊन चिमण्यांसाठी घरटी (Nest), धान्याची (Bird Feeder) तसेच पाण्याची भांडी(Water Feeder) यांचा मोफत पुरवठा केला जातो. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील आमी जीवदया संस्थेच्या वतीने दरवर्षी २० मार्च चिमणी दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला जातो.
यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळांना भेटी देणे शक्य नसल्याने निफाड तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळांना मोफत चिमण्यांसाठी घरटी व फिडर देणार आहे. याबाबतची माहिती आमी जीवदया कंपनीचे संस्थेचे संचालक हिरेश शहा यांनी दिली. तर याबाबत शाळांच्या शिक्षकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही शहा यांनी केले.
शाळेने पत्र दिल्यास घरटी मोफत -
दरवर्षी चिमणी दिवसाच्या निमित्ताने शाळांना भेटी देऊन शेकडो चिमणीचे घरटे व त्यांना दाणापाणीसाठी ब्लड फिटर व पाण्याच्या बाटल्या, आदी. साहित्य परिसरात बसवले जातात. मात्र, यावर्षी कोरोनाचा कहर असल्याने शाळांना भेटी देणे शक्य नाही. त्यामुळे मुख्याध्यापक यांचे मागणीचे पत्र दाखवून मोफत चिमणीचे घरटे व इतर साहित्य घेऊन जावे, असे आवाहन हिरेश शहा यांनी मुख्याध्यापकांना केले आहे.
हेही वाचा - कोरोना प्रतिबंधक बीएमसी महिला मार्शलला मारहाण
घरटी लावतांना काय काळजी घ्यावी?
याबाबत घरट्यांवर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी. दुपारी बारा वाजेनंतरचे ऊन घरट्यांवर येणार नाही, याची काळजी घ्यावी. घरटी खिडकीच्या ग्रिलवरच्या आत लावावी. जवळ आवाज गोंगाट होणार नाही, याची काळजी घ्यावी. घरट्यांवर हात लावू नका. घरटी तुम्ही स्वच्छ करू नका. मांजरीची उडी पोहोचणार नाही, अशा ठिकाणी घरटी असावी. तसेच वीजेच्या तारा सांभाळव्यात आणि चिमण्यांच्या पिलांना हात लावू नये, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - धक्कादायक! मादी श्वानावर लैंगिक अत्याचार; एकावर गुन्हा दाखल