ETV Bharat / state

उन्हामुळे नाशकात भक्तांकडून चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप

मूर्तीभोवती मोगरा व इतर सुगंधी फुलांची आरास करण्यात आली आहे, जशी माणसांना उष्णता सहन होत नाही तशी मूर्तीला देखील उष्णता सहन होत नसल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप
author img

By

Published : May 12, 2019, 8:54 PM IST

नाशिक - तापमानाचा पारा वाढला म्हणून देवालाही उष्णतेची दाहकता सोसावी लागत आहे. त्यामुळे नाशिकच्या रविवार कारंजा गणेशमूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. चांदीच्या गणेश मूर्तीला सुवासिक चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. चंदनाची उटी दोन दिवस ठेवण्यात येणार असून त्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाणार आहे. नाशिकचा मानाचा समजल्या जाणाऱ्या चांदीचा गणपतीला गेल्या ९ वर्षांपासून अशा प्रकारे लेप लावण्यात येतो.

चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप

या उपक्रमाद्वारे मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे मूर्तीची दाहकता कमी करण्यासाठी आणि मंदिराच्या आवारात शीतलता व सुगंधी निर्मिती व्हावी, यासाठी मंडळाच्यावतीने गेल्या ९ वर्षांपासून हा उपक्रम भाविकांच्या सहकार्याने राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिली.
नाशिकच्या रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक गणपती मूर्तीस चंदनाचा लेप भाविकांच्या हस्ते लावण्यात आला. मूर्तीभोवती मोगरा व इतर सुगंधी फुलांची आरास करण्यात आली आहे, जशी माणसांना उष्णता सहन होत नाही तशी मूर्तीला देखील उष्णता सहन होत नसल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

Intro:नाशिकच्या रविवार कारंजा गणेशमूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात आलाय..तापमानाचा पारा वाढला म्हणून देवालाही उष्णतेची दाहकता सोसावी लागत असल्याची भक्तांची भावना असल्याने दाहकता कमी करण्यासाठी चांदीच्या गणेश मूर्तीला सुवासिक चंदनाचा लेप लावण्यात आलाय चंदनाची उटी दोन दिवस ठेवण्यात येणार असून त्यानंतर प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जानार आहे नाशिकचा मानाचा समजल्या जाणाऱ्या चांदीचा गणपतीला गेल्या नऊ वर्षांपासून अशा प्रकारे लेप लावण्यात येतोय..

Body:सदर उपक्रमाद्वारे मे महिन्यातील तीव्र उष्णता मुळे मूर्तीची दाहकता कमी करण्यासाठी आणि मंदिराच्या आवारात शीतलता व सुगंधी निर्मिती व्हावी यासाठी मंडळाच्या वतीने मागील नऊ वर्षांपासून हा उपक्रम भाविकांच्या सहकार्य राबविण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितली

Conclusion:नाशिकच्या रविवार कारंजा येथील सिद्धिविनायक गणपती मूर्तीस चंदनाचा लेप भाविकांच्या हस्ते लावण्यात आला असून मूर्तीच्या भोवती मोगरा व इतर सुगंधी फुलांची आरास करण्यात आली आहे जशी माणसांना उष्णता सहन होत नाही तशी मूर्तीला देखील उष्णता सहन होत नसल्याची भाविकांची श्रद्धा आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.