ETV Bharat / state

आघाडीच्यावतीने समीर भुजबळ, धनराज महाले यांचा अर्ज दाखल

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची रॅली अथवा शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली.

समीर भुजबळ आणि धनराज महाले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Apr 9, 2019, 10:49 PM IST

नाशिक - समीर भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून तर धनराज महाले यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

धनराज महाले आणि समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

समीर भुजबळ यांनी कोमल चंद्रकांत जगदाळे (खेळाडू), मंजुळा सुरेश धनगर (आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी) कल्याणी अहिरे (दलित युवती), यशोदा केशव गोसावी (शहिदांच्या पत्नी) यांच्यासोबत जाऊन आपला निवडणूक अर्ज दाखल केला. तर दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले यांनी पूनम दिनकर सोनुने (खेळाडू), आदेश उत्तम बोडके (बेरोजगार तरुण), नितीन पवार, विलास निरगुडे यांच्यासोबत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, जोगेंद्र कवाडे, मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक उपस्थित होते.

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची रॅली अथवा शक्तिप्रदर्शन न करण्याचा निर्णय आम्ही घेतली असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली. यावेळी समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्यावतीने धनराज महाले निवडणूक लढवत आहेत. त्यांनीदेखील अत्यंत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.

Intro:Body:

नाशिक- समीर भुजबळ आणि धनराज महाले यांचा अर्ज दाखल..

Inbox

    x

KAPIL PRAKASH BHASKAR

5:26 PM (4 hours ago)

to me, Kapil

नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून धनराज महाले यांनी आघाडी च्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कुठल्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता अत्यंत साधेपणाने या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.समीर भुजबळ यांनी कोमल चंद्रकांत जगदाळे (खेळाडू) मंजुळा सुरेश धनगर (आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी) कल्याणी अहिरे ( दलित युवती)

यशोदा केशव गोसावी (शहिदांच्या पत्नी) यांच्या सोबत जाऊन आपला निवडणूक अर्ज दाखल केला तर दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले पूनम दिनकर सोनुने (खेळाडू)

आदेश उत्तम बोडके (बेरोजगार तरुण) नितीन पवार

विलास निरगुडे यांच्या सोबत अर्ज दाखल केला, ह्यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील,बाळासाहेब थोरात ,जोगेंद्र कवाडे,मनसे चे माजी महापौर अशोक मुर्तडक उपस्थित होते...

राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रॅली अथवा शक्तिप्रदर्शन न  करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचं माहिती समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिली.दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आघाडीच्यावतीने धनराज महाले निवडणूक लढवत आहेत त्यांनी देखील अत्यंत साधेपणाणे आपला उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.यावेळी समीर भुजबळ यांची पत्नी शेफाली भुजबळ यांनी दाखल केलाय

टीप फीड मोजो वरून पाठवले आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.