नाशिक - मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करून मार्ग निघणार नाही, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांच्या भेटीची वाट पाहतोय. पण मला अजून मोदींकडून वेळ मिळालेला असे देखील त्यांनी सांगितलं.
खासदार संभाजीराजे छत्रपती हे नाशिकमध्ये आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, पहिल्या दिवसापासून मराठा समाजाने सामाजिक मागास सिद्ध केले. ईडब्लूएस आरक्षण घेतल्याने समाजाला धोका होणार नाही हे सरकारने सांगावे. ईडब्लूएस आरक्षण घेतल्याने एसईबीएसला धोका निर्माण होईल. ईडब्लूएस आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे. ते फक्त मराठा समाजासाठी नाही. न्यायालयावर आमचा विश्वास असून चांगला निर्णय अपेक्षित आहे.
प्रवीण गायकवाड यांचीच मागणी होती की, वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितलं. ओबिसी समाजात भीती निर्माण झाली आहे हे खरं आहे. मात्र ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या, या मागणीचा संभाजीराजे यांनी पुर्नउच्चार केला.
नामांतराला पाठिंबा
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने औरंगाबादचे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागत करायला पाहिजे. औरंगाबादचे नाव बदलायला माझे समर्थन असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
गडकिल्यांचे संवर्धन करा
आधी किल्ल्यांचा जतन होणे गरजेचे असून शिवस्मारक झाला तर आनंदच आहे. सर्वाधिक गड किल्ले नाशिक जिल्ह्यात असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवस्मारकची जागा का बदलली असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - नाशिक : नांदगावच्या जंगल परिसरात वणवा पेटला, वन्य पशु-पक्ष्यांची हानी
हेही वाचा - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नाशिकहुन शेतकरी रवाना