नाशिक : मुंबई येथील काही साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला आले होते. यावेळी ते दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना तवेरा कंपनीच्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आणि गाडीचा वेग अधिक असल्याने गाडी महामार्गावरून दीडशे फूट लांब वर पलटी झाली. त्यामुळे वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. (Vehicle Accident, 2 killed, 7 injured)
दोघांचा जागीच मृत्यू : या अपघातात मीरा भाईंदर येथील इंद्रदेव मोरया (indradev morya) (28) आणि सत्येंद्र यादव (Satyendra Yadav) (27) यांना गंभीर मार लागल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या वाहनातील आणखी सात जण गंभीर झाले असून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या मदतीन त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.