ETV Bharat / state

सदाभाऊ खोत नाशिक दौऱ्यावर; द्राक्ष बागांची केली पाहणी, शेतकऱ्यांना अश्रू अनावर - sadabhau khot visits nashik

अवकाळी पावसाचा हाहाकारामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे वडाळा भोई गावाच्या परिसरात द्राक्ष बागांची पाहणी करायला आले असतांना, आपल्या पिकांची झालेली नासाडी दाखवतांना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

सदाभाऊ खोत नाशिक दौऱ्यावर
author img

By

Published : Nov 1, 2019, 11:42 AM IST

नाशिक - परतीच्या पावसाने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील नगदी पिकाची नासाडी केली. त्यामुळे या भागातला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

सदाभाऊ खोत नाशिक दौऱ्यावर

अवकाळी पावसाचा हाहाकारामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. नाशिक जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे वडाळा भोई गावाच्या परिसरात द्राक्ष बागांची पाहणी करायला आले असतांना, आपल्या पिकांची झालेली नासाडी दाखवतांना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा -
नाशिक जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्‍टर पिकाचे नुकसान, विमा कंपन्यांना सहकार्य करण्याचे निर्देश

परतीच्या पावसाचा नाशिक जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा यापूर्वेकडील आणि मध्य नाशिकमधील तालुक्यांमध्ये झालेले आहे. तर, त्र्यंबक, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. यात द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान निफाड, बागलाण, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये झालेले आहे. येत्या आठ दिवसात पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाणार माहिती सदाभाऊ यांनी दिली. तसेच पंचनामा करण्यास दिरंगाई झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक! बहिणीच्या मृतदेहाजवळ ती होती 11 दिवस बसून..

जिल्ह्यामध्ये यावर्षी लागवडीखालील 7.40 लाख हेक्‍टर क्षेत्रांपैकी प्राथमिक अंदाजानुसार साधारण 3.26 लाख हेक्टर म्हणजेच 50 टक्के पिकांचे नुकसान झालेले आहे. याअंतर्गत पीकनिहाय विचार केल्यास मका या पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण 2.25 लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी साधारणतः 60 ते 70 टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 60 हजार हेक्टर क्षेत्रांमधील द्राक्ष बागांचे साधारण 70 टक्केपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा - बागलाण तालुक्यात पावसामुळे पीकाचे नुकसान, शेतकऱ्याची आत्महत्या

Intro:परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील नगदी पीक होत्याची नव्हती झाली आहे.त्यामुळे या भागातला शेतकरी संकटात सापडलाय आणि याच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सदाभाऊ खोत हे आज नाशिक दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेBody:* नाशिक breaking : -

-नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना सदाभाऊ खोत यांच्या समोर पुन्हा शेतकऱ्यांचे अश्रू अनावर
-वडाळा भोई गावाच्या परिसरात सादाभाऊ खोत यांनी केली द्राक्ष बागाची पाहणी
-गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्ष,कांदा,भाजीपाला या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान
-येत्या आठ दिवसात पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाणार सदाभाऊ यांची माहिती
-पंचनामा करण्यास दिरंगाई झालं तर अधिकाऱ्यावर कारवाई करणार..
- अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा यापूर्वेकडील आणि मध्य नाशिकमधील तालुक्यांमध्ये झालेले आहे.

- त्र्यंबक, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी आणि कळवण यातालुक्यांमध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान निफाड, बागलाण, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये झालेले आहे. तसेच सर्वात जास्त नुकसान हे मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले असून
- जिल्ह्यामध्ये यावर्षी लागवडीखालील 7.40 लाख हेक्‍टरक्षेत्रापैकी प्राथमिक अंदाजानुसार साधारण 3.26 लाख हेक्टर म्हणजेच 50 टक्के पिकांचे नुकसान झालेले आहे. याअंतर्गत पीकनिहाय विचार केल्यास मका या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्ह्यातील एकूण 2.25 लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी साधारणतः 60 ते 70 टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 60 हजार हेक्टर क्षेत्रांमधील द्राक्ष बागांचे साधारण 70 टक्केपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान पाहता द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे....Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.