ETV Bharat / state

नाशिक हादरलं, आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या - Nashik crime

प्रेयसीवर तब्बल 30 वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना दिवाळीच्या दिवशीच गंगापूर राेडवरील संत कबीर नगर झाेपडपट्टीत घडली आहे. आरोपी दाेन खुनांच्या गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भाेगून बाहेर आला होता.

rpi women murder
नाशिक हादरलं, आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या
author img

By

Published : Nov 4, 2021, 3:29 PM IST

नाशिक - दाेन खुनांच्या गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भाेगून बाहेर आलेल्या प्रियकराने आरपीआयची पदाधिकारी असलेल्या प्रेयसीवर तब्बल 30 वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना दिवाळीच्या दिवशीच गंगापूर राेडवरील संत कबीर नगर झाेपडपट्टीत घडली आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शहरात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या दाेघांत आर्थिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

पूजा संदीप आंबेकर (वय 32, रा. संत कबीर नगर झाेपडपट्टी, नाशिक) असे आरपीआयच्या मृत महिला पदाधिकाऱ्याचे नाव असून संताेष विष्णू आंबेकर (वय 37, रा. संत कबीर नगर)असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे.

आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या
गेल्या काही दिवसांपूर्वीच संताेष आंबेकर हा दाेन खुनांच्या गुन्ह्यात शिक्षा भागून जेलमधून बाहेर आला हाेता. गेल्या काही दिवसांपासून पूजा हिच्यासंह झाेपडपट्टीतील एका पत्र्याच्या घरात लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत हाेता. दाेघांमध्ये आर्थिक वादातून भांडणे हाेत हाेती.

गुरुवारी सकाळी दाेघांत पैशांच्या वादातून भांडण झाले. तेव्हा संतोषने धारदार चाकू काढून पूज्या हिच्या गालावर, पाेटावर आणि मानेवर तब्बल 30 वार केले. वर्मी घाव लागल्याने व अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गंगापूर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी संताेष आंबेकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शाेध घेतला जात आहे.

हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.