ETV Bharat / state

निफाड-नाशिक रस्त्यावर अपघात, एक ठार

निफाड नाशिक रस्त्यावर एका ट्रकला अपघात झाला असून यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. पुलावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर दुर्लक्ष करत असून येथील खड्डे तात्काळ दुरूस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

author img

By

Published : Jul 31, 2019, 9:54 PM IST

नाशिक- निफाड-नाशिक रस्त्यावरून वरून नांदगावच्या दिशेने युरिया घेऊन जाणारा ट्रक खड्डा वाचविताना सिंगापूर पुलावरून खाली कोसळला. यात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

कादवा नदीवरील सिंगापूर पुलावरून युरिया खताचा ट्रक (एमएच 15 केजी 7820) नांदगावकडे जात होता. पुलावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात दहा टन युरियाने भरलेल्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या खाली शंभर फूट कोसळला. अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. ट्रकमध्ये चालकासह चार प्रवासी होते. या अपघातात ट्रकचालक दशरथ उत्तम सांगळे (वय-27, रा. बेळगाव, ता. नांदगाव) यांचा मृत्यू झाला. तर विलास केंद्रे, सुका गवळी, उत्तम माळी, ताराबाई माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर निफाड येथील जनसेवा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात झालेला ट्रक
निफाड-नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वरदळ असते. गेल्या अनेक महिन्यांपासून या पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. तीन महिन्यांपूर्वीही ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग यावर दुर्लक्ष करत असून येथील खड्डे तात्काळ दुरूस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Intro:निफाड -नाशिक रोड वरील कादवा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला, एक ठार ,चार जण जखमी..

Body:निफाड -नाशिक रोड वरून नांदगाव च्या दिशेने युरिया घेऊन जाणार ट्रक,कादवा नदीच्या सिंगापूर पुलावरून जात असतांना खड्डा वाचवतांना ट्रक पुलावरून खाली कोसळला, यात
एक जण ठार ,एक गंभीर जखमी झाला आहे..

निफाड येथील कादवा नदीवरील सिंगापूर पुलावरून युरिया खताचा ट्रक एमएच 15 केजी 7820 नांदगावला
जात असताना पुलावरील खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात
दहा टन युरियाने भरलेल्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक दोन्ही पुलाच्या मध्ये शंभर फूट खाली कोसळला,
अपघात इतका भीषण होता की ट्रक च्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या ट्रकमध्ये चालकासह चार प्रवासी होते ह्या अपघात ट्रकचालक दशरथ उत्तम सांगळे वय 27 रहाणार बेळगाव ,तालुका नांदगाव यांचा मृत्यू झाला,तर विलास केंद्रे, सुका गवळी,उत्तम माळी,ताराबाई माळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनावर निफाड येथील जनसेवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत..

नाशिक निफाड औरंगाबाद रोड वर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा असते,गेल्या अनेक महिन्यापासून ह्या पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत,तीन महिन्यापूर्वी ट्रकच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला होता, सार्वजनिक बांधकाम विभागा ह्या कडे दुर्लक्ष करत असून हे येथील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे...
टीप फीड ftp
nsk truck accident viu 1
nsk truck accident viu 2
nsk truck accident viu 3
nsk truck accident viu 4
nsk truck accident viu 5
nsk truck accident viu 6

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.