ETV Bharat / state

नाशिकमधील वैतरणा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर कोसळली दरड - electricity

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली आहे.

वैतरणा प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर कोसळली दरड
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:58 PM IST

नाशिक - इगतपुरी आणि घोटी परिसरात जोरदार पावसामुळे मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दरड कोसळली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डोंगरावरील पाण्याचा प्रवाह प्रकल्पाच्या आतमध्ये घुसला आहे.

इगतपुरी पासून जवळच वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. धरणाच्या पाण्याच्या वापर करुन येथे वीज निर्मिती करण्यात येते. हा जलविद्युत प्रकल्प डोंगराच्या कडेला आहे. बुधवारी रात्रीपासून या परिसरात ढगफुटीसारखा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे डोंगरावरील दरडीचा एक मोठा भाग थेट जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोसळला. यात प्रकल्पाशेजारी असणाऱ्या २ पोलीस चौक्या उद्ध्वस्त झाल्या. तसेच पोलिसांच्या २ रायफली आणि २ मोटारसायकल सह येथील कर्मचाऱ्यांच्या ४ दुचाक्या ही वाहून गेल्या आहेत. चौकीत असलेल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षक प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

पावसामुळे कामगारांना सेवा देणारे मोठे वाहनमध्येच अडकले आहे. त्यामुळे वीज निर्मिती केंद्राकडे जाणार रस्ता बंद झाल्याने वीज निर्मितीचे काम थांबवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आरती सिंग, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना मांडगे या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Intro:वैतरणा जलविद्युत केंद्रावर दरड कोसळली,दोन पोलीस चौक्या उध्वस्त पोलिसांच्या बंदुकी गेल्या वाहून....

Body:नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि घोटी परिसरात जोरदार पावसामुळे मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली तसेच मोठ्या प्रमाणात डोंगरावरील पाण्याचा प्रवाह आत मध्ये घुसला या घटनेत प्रकल्पात उभ्या असलेल्या वाहने वाहून गेल्याचे समजते....तसेच या प्रवेशद्वारावरील दोन पोलिस चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत..चौकीत असलेल्या पोलिस आणि सुरक्षा रक्षक प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्याने सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही,मात्र दोन पोलिसांच्या रायफली पाण्यात वाहून गेल्या असून पोलिसांच्या दोन मोटारसायकल सह येथील कर्मचाऱ्यांच्या चार दुचाकी ही वाहून गेल्या आहेत....कामगारांना सेवा देणारे मोठे वाहन मध्ये अडकले आहे विज निर्मिती केंद्रा कडे जाणार रस्ता बंद झाल्याने वीज निर्मितीचे काम थांबवण्यात आले असून पोलिस अधीक्षक आरती सिंग, प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार वंदना मांडगे ह्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती ,

इगतपुरी पासून जवळच वैतरणा धरणावर जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे ,धरणाच्या पाण्याच्या वापर होऊन येथे वीज निर्मिती येथे करण्यात येते, हाजलविद्युत प्रकल्प डोंगराच्या कडेला आहे, बुधवारी रात्रीपासून या परिसरात ढगफुटीसारखा जोरदार पाऊस कोसळला ह्या पावसामुळे डोंगरावरील मोठ दरडीचा एक भाग थेट जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोसळा, यात दोन पोलिस चौक्या उध्वस्त झाल्या असून पोलिसांच्या दोन रायफली आणि चार दुचाकी वाहून गेल्यात..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.