ETV Bharat / state

दिंडोरी येथे नरहरी झिरवळ यांची आढावा बैठक

author img

By

Published : Apr 20, 2021, 8:32 PM IST

येथिल ग्रामपंचायत येथे वणी व पंचक्रोशितील कोरोना रुग्नांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक सोमवार आज पार पडली. यावेळी झिरवाळांनी परिस्थीतीची संबधित आधिकाऱ्यांकडुन संपुर्ण माहिती घेत कोरोनाचा अटकाव करण्यासंदर्भात विचारविनिमय करत संबधितांना सुचना केल्या.

दिंडोरी येथे नरहरी झिरवळ यांची आढावा बैठक
दिंडोरी येथे नरहरी झिरवळ यांची आढावा बैठक

दिंडोरी (नाशिक) - येथिल ग्रामपंचायत येथे वणी व पंचक्रोशितील कोरोना रुग्नांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक सोमवार आज पार पडली. यावेळी झिरवाळांनी परिस्थीतीची संबधित आधिकाऱ्यांकडुन संपुर्ण माहिती घेत कोरोनाचा अटकाव करण्यासंदर्भात विचारविनिमय करत संबधितांना सुचना केल्या.

यावेळी वणीकरांच्या तर्फे वणीत ऑक्सिजन निर्मिती प्लँट तयार करता येईल का? जर हा प्लँट शक्य झाला तर वणी सह कळवण, सुरगाणा या तालुक्यांतील सरकारी व खासगी हॉस्पिटललाही पुरवठा करता येईल व त्यामुळे अत्यावश्यक वेळी नाशिक सिव्हीलवर येणारा भार हलका होईल, असे माजी उपसरपंच विलास कड व मनोज शर्मा यांनी आमदार झिरवाळांना सांगितले. तसेच वणीसाठी वणीतील आदीवासी मुला-मुलींचे हॉस्टेल स्वतंत्र विलिगीकरण कक्ष म्हणुन सुरु करण्याबात मागणी केली गेली. आमदार झिरवळांनी तात्काळ वरिष्टांशी पाठपुरावा करुन संबधीतांना कार्यवाही करायला सांगत पुढील दोन दिवसात सदरचे विलिगीकरन कक्ष कार्यन्वित करावे यासाठी सुचना दिल्या. वणी ग्रामिण रुग्नालयातील वैद्यकिय अधिकेषक डॉ. राजेंद्र बागुल व त्यांचे सहकारी अतिशय उत्कृष्टपणे कोरोना कक्षात त्यांची कामगिरी बजावत असुन त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

जनता कर्फ्युचे पालन करावे-

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता वणी व पंचक्रोशितील जनतेला पुढील काही दिवस तरी प्रशासनाला सहकार्य करीत जनता कर्फ्युचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करण्याचे उपस्थित व्यापारी व नागरीकांस आवाहन केले व परिसरात कुणाकडे लग्न सोहळा अथवा दशक्रिया, वर्षश्राद्धाचे कार्यक्रम असतील तर त्यांनी प्रशासनाने घालुन दिलीले नियम पाळावेत, असे सांगितले. व जर कुणी नियमांचे उल्लघंन केले आढळल्यास संबधितावर कठोर कारवाई करण्याचे देखिल उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी वणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपुत,वैद्यकिय अधिक्षक डॉ. राजेद्र बागुल, पांडाणे प्रा. आ. केद्राचे डॉ. साबळे, ग्रामसेवक संजय, देशमुख, सर्कल अधिकारी ज्ञानेश्वर केसरे, प्रतिष्टीत व्यापारी महेद्र बोरा, प्रकाश कड, विजु बर्डे, शरद महाले, प्रकाश बोरा, प्रकाश वाघ, सचिन देशमुख, मुकेश सिसोदिया, अल्केश खाबिया, सागर मोर आदी उपस्थित होते.

हेही वाचा- राज्यात लागणार टाळेबंदी, लवकरच मुख्यमंत्री करणार घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.