नाशिक - प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व केलेल्या पूर्वतयारीमुळे आपण निसर्ग चक्रीवादळाचा सामना करू शकलो, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ते आज नाशिक दौर्यावर आले होते.
निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईत फारसा परिणाम दिसला नाही. मात्र नाशिक जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू आहेत. ते येत्या दोन दिवसात ओटोपून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच शासनस्तरावर मदतीची घोषणा करण्यात येईल, असेदेखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
आज जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण व निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.