ETV Bharat / state

नाशिकमध्ये यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस; नांदूर-मधमेश्वर धरणातून 2 लाख 91 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग - नांदूर-मधमेश्वर धरणातून

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरासरीत १०५ टक्के पाऊस नाशिकमध्ये पडला आहे. नाशिकमधून आत्तापर्यंत ७३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे विसर्ग करण्यात आले आहे.

जवानांशी ईटीव्ही भारतच्या प्रतीनिधीने बातचीत केली
author img

By

Published : Aug 13, 2019, 11:28 PM IST

नाशिक - गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. तब्बल पंधरा दिवसांनी हा विसर्ग थांबविण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरासरीत १०५ टक्के पाऊस नाशिकमध्ये पडला आहे. इतिहासात पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. नाशिकमधून आत्तापर्यंत ७३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे विसर्ग करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस

पावसामुळे दरवर्षी होणारा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वादही टळणार आहे. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे नुकसानीची आकडेवारी देखील कमी आहे. विशेष बाब म्हणजे नाशिकमधील धरणात मराठावाड्याला जास्तीचे पाणी सोडूनही ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या मान्सून हंगामात नाशिकमध्ये पावसाने आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. पहिल्यांदाच नांदूर-मधमेश्वर धरणातून 2 लाख 91 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. नदीलगतच्या 22 हजार हेक्टर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासकीय पातळीवर शेतजमिनीचे पंचनामे चालू आहेत. शेतकऱ्यांना तातडीने पहिल्या टप्प्यात सात हजार रुपये देण्यात येत आहेत. तसेच पुरामुळे गोदावरी नदी पात्रालगतच्या जवळपास तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती मांढरे यांनी दिली. पुराच्या पाण्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला. नागरिक पूर ओसरल्यामुळे आपआपल्या घरी जात असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग हा थांबविण्यात आलाय. तब्बल पंधरा दिवसांनी हा विसर्ग थांबविण्यात आलाय. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्ग पुर्णपणे थांबविण्यात आलाय. गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ९० टक्क्यांवर येऊन ठेपलाय. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता वार्षिक सरसरीत १०५ टक्के पाऊस नाशिकमध्ये पडलाय. इतिहासात पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झालीय. नाशिकमधून आत्तापर्यंत ७३ टीमसी पाणी जायकवाडीकडे विसर्ग करण्यात आलाय. Body:दरवर्षी होणारा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वादही टळणार आहे. मात्र यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस होऊनही प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे नुकसान आकडेवारी देखील कमी आहे. विशेष बाब म्हणजे नाशिकमधील धरणात मराठावाड्याला जास्तीचे पाणी सोडूनही ८१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

बाइट 01 - सूरज मांढरे - जिल्हाधिकारी, नाशिकConclusion:यंदाच्या मासुन हंगामात नाशिकमध्ये पावसाने आजवरचे सगळे विक्रम मोडीत काढत इतिहासात नोंद केलीय असुन पहिल्यांदाच नांदूर-मधमेश्वर धरणातून 2 लाख 91 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला असल्याच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितलंय नाशिक मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नंदिला पुर आल्याने नंदि लगतच्या बाविस हजार हेक्टर जमिनीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासकीय पातळीवर शेतजमीचे पंचनामे चालू असुन शेतकऱ्यांना तांतडिने पहिल्या टप्प्यात सात हजार रूपये देण्यात येत आहे तसेच पुरामुळे गोदावरी नंदी पात्रालंगतच्या जवळपास तीन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती मांढरे यानी दिली
पुराच्या पाण्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांना शासकीय मदत देण्यात आली आहे पुरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या नागरिक पुर ओसरल्या मुळे ते आपआपल्या घरी जात आहे सततच्या मुसळधार पावसामुळे आपत्तीव्यवस्थापन पोलीस प्रशासन सर्व शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे परिस्थिती नियत्रंनात होती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.