नाशिक - भाजप-सेना आणि घटक पक्षांची युती असली तरी युतीतला संघर्ष सारखा पाहायला मिळतो. भाजप-सेना अन्याय करत असल्याचा आरोप घटक पक्ष करत असतात. मात्र, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मी नाराज असतो तरी आता भाजपसोबत आहे. अन् आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी असली तरीही आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचे स्पष्ट केले आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
हेही वाचा - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
जानकर म्हणाले, आम्हाला कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. फक्त विकासाच्या मुद्दयावर आम्ही महायुतीबरोबर राहणार आहोत. जानकर हे महायुतीच्या प्रचारार्थ नाशिक दौऱ्यावर आले असताना तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीत भाजपच सगळ्यात बलवान आहे. भाजपच सगळ्यांचा मोठा भाऊ असल्याचे जानकर म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली असल्याचे जानकर यावेळी म्हणाले.
जानकर स्वत:च्या पक्षाबद्दल बोलताना म्हणाले, रासप आणि भाजपतील भांडणं ही घरातली आहेत. आमच्यातील भांडणं मिटली आहेत असं जानकरांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोणालाही मोठे होऊ दिले नाही. सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवले, असा आरोपही जानकरांनी आघाडीवर केला.
हेही वाचा - रविकांत तुपकरांची घरवापसी? पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत करणार प्रवेश