नाशिक - नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या मुलीच्या विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी चक्क आईनेच 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आईला अटक केली आहे.
टाकळी-विंचूरच्या एका हॉटेलमध्ये रंगेहात अटक
काही महिन्यांपूर्वी श्रीरामपूर येथील एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीचे जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या पुतण्यासोबत लग्न लावून दिले. यानंतर आपल्या इच्छेविरुद्ध विवाह करून आपला विनयभंग केल्याची तक्रार संबंधित मुलीने जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह 5 जणाविरुद्ध जामनेर पोलिसात दाखल केली होती. मात्र, मुलीने केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पीडित मुलीच्या आईने पारस ललवाणी यांच्याकडे तब्बल 25 लाख रुपयांची खंडणी मागितली.
ही रक्कम स्वीकारण्यासाठी नाशिकच्या लासलगाव तालुक्यातील टाकळी-विंचूर येथे असलेल्या एका हॉटेलवर ही महिला गेली होती. यावेळी लासलगाव पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर या महिलेला रंगेहात अटक केली. अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
दरम्यान, लासलगाव पोलिसांनी मुलीच्या आईला 25 लाख रुपयांची खंडणी स्वीकारत असताना रंगेहात अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत. मात्र, या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - निस्वार्थ सेवेला सलाम... पीपीई किटमध्येच नर्स झोपली जमिनीवर
हेही वाचा - 'सांड की आँख'मधील शूटर दादी चंद्रो तोमर यांचे निधन, भूमी पेडणेकरने केली होती भूमिका