ETV Bharat / state

रामकुंडावर दररोज होणार गोदाआरती; 24 लाखांची तरतूद

गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड येथे रोज सायंकाळी गोदावरी आरती होणार आहे. यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 24 लाखांची तरतूद केली आहे.

author img

By

Published : Sep 20, 2019, 11:54 AM IST

रामकुंडावरील आरती

नाशिक - वाराणसी आणि हरिद्वार येथे होणाऱ्या गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड येथे रोज सायंकाळी गोदावरी आरती होणार आहे. यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 24 लाखांची तरतूद केली आहे. गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदाआरती करण्यात आली.

वाराणसी, हरिद्वार येथे होणाऱ्या गंगा आरतीला रोज हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात. दक्षिणकाशी तसेच कुंभनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदातीरावर देखील याच धर्तीवर गोदाआरती व्हावी, यासाठी पुरोहित संघासह नाशिककरांनी मागणी केली होती. यावर पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गोदावरी आरतीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी साधारण 24 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच या निधीतून पुरोहित संघाला दोन ते अडीच किलोचे अकरा मोठे आरतीचे ताट, यासह पूजेचे साहित्य देखील पुरवण्यात आले आहे.

आरतीसाठी खास म्युझिक सिस्टिम व भोंगे देखील देण्यात आले आहेत. या गोदाआरती उपक्रमाला गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, माजी आमदार वसंत गिते, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:हरिद्वार,वाराणसीच्या धरतीवर आता नाशिक मध्ये रोज होणार गोदआरती...

Body:वाराणसी हरिद्वार येथे होणाऱ्या गंगा आरतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड येथे आता रोज सायंकाळी गोदावरीआरती होणार आहे, यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने 24 लाखाची तरतूद करण्यात आली आहे, गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदाआरती करण्यात आली,

वाराणसी, हरिद्वार येथे होणाऱ्या गंगा आरतीला रोज हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात, दक्षिणकाशी तसेच कुंभ नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोदातीरावर देखील याच धर्तीवर गोदाआरती व्हावी यासाठी पुरोहित संघासह नाशिककरांनी मागणी केली होती,ह्यावर पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गोदावरीआरतीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, आहे त्यासाठी साधारण 24 निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून पुरोहित संघाला दोन ते अडीच किलो चे अकरा मोठे आरतीचे ताट ,यांसह पूजेचे साहित्य देखील पुरवण्यात आले आहे,तर आरती साठी खास म्युझिक सिस्टिम भोंगे देखील देण्यात आले आहेत, या गोदाआरती उपक्रमाला गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन पर्यटनमंत्री जयकुमार रावल ,आमदार बाळासाहेब सानप,आमदार देवयानी फरांदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, माजी आमदार वसंत गिते सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, विजय साने,यांच्या सह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टीप फीड ftp
nsk goda arati viu 1
nsk goda arati viu 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.