नाशिक - नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेला पवित्रा पाहता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्षपद अमित यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
राज ठाकरे यांनी घेतलेला पवित्रा पाहता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्षपद अमित यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : अमित ठाकरेंकडे येऊ शकते मोठी जबाबदारी
नाशिक - नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे स्वतः लक्ष घालत आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेला पवित्रा पाहता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्षपद अमित यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जी जबाबदारी देतील ती घेईल
कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, राज ठाकरे जी जबाबदारी देतील ती घ्यायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचेही अमित ठाकरे यांनी सांगितलं.
कुणी मनसेबाहेर जाण्याने फरक नाही
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसेला सोड चिठ्ठी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या संदर्भात बोलताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कुणाच्याही येण्याजाण्याने मनसेला काहीही फरक पडत नसल्याचे सांगितले. मनसे केवळ राज ठाकरे यांच्या नावावर चालते. जे गेले त्यांना शुभेच्छा, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.